शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठाण्यातील तीन हॉटेलवर कारवाई!

By जितेंद्र कालेकर | Updated: October 18, 2023 21:44 IST

या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे: स्वयंपाकगृहातील अस्वच्छतेसह अन्न पर्दाांची हाताळणी करणारे कामगार संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असलेल्याचा तपासणी अहवाल नसणे, पिण्यायोग्य पाणी न ठेवणे, पार्सल आणि विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यासह अनेक त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या ठाण्यातील गजानन वडापाव, बिर्याणी कबाब करी आणि भिवंडीच्या गोरसईतील दिल्ली दरबार ढाबा या तीन हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सील बंद करण्याची कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईने बड्या हॉटेल तसेच उपहारगृह चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे यांच्या पथकाने ठाण्यातील वंदना सिनेमागृहाजवळील ओम साईराम फूडस यांच्या बिर्याणी कबाब करी या हॉटेलवर १८ ऑक्टोबर रोजी अचानक धाड टाकली. या धाडीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. याठिकाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, अन्न पदार्थांची विक्री करतांना, कच्च्या पदार्थांची हाताळणी करणाऱ्या कामगारांचे संसर्गजन्य, त्वचारोग किंवा तशाच आजारांपासून मुक्त असल्याचा वैद्यकीय दाखला नसणे, अन्न पदार्थांची खरेदी विक्री बिले नसणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशा ३१ त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत. 

असाच प्रकार सदानंद भालेकर यांच्या ‘राजमाता वडापाव’ या राममारुती रोडवरील उपहारगृहातही आढळला. याठिकाणी वडाभाव बनविण्यासाठी तयार केलेली चटणी, कांदा भजी आदी साहित्य उघड्या भांडयात ठेवल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला नसणे, स्वयंपाकगृहातील अस्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल केल्याचे बिल नसणे अशा २७ त्रुटी याठिकाणीही आढळल्या. त्यामुळे हे दोन्ही हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले.

भिवंडीतील दिल्ली दरबारमध्येही अनियमितताभिवंडीतील ‘दिल्ली दरबार’ या ढाब्यावरही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. योग्य शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीकडे पर्यवेक्षक पदी नेमणूक नसणे, पाणी पिण्यायोग्य असल्याचा दाखला नसणे, कामगारांची आरोग्य तपासणीचा दाखला नसणे, स्वच्छतेचा नियमांना हारताळ फासणे आणि पेस्ट कंट्रोल केल्याचा अहवाल नसणे अशा त्रुटी याठिकाणच्या तपासणीत आढळल्या. त्यामुळे हा ढाबा बंद करण्याची नोटीस अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. वीरकायदे यांनी बजावली आहे. या तिन्ही हॉटेलांवरील कारवाईने अन्न पदार्थांची नियमांना हारताळ फासून विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि उपहारगृह चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :thaneठाणे