शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:13 IST

उल्हासनगरात तीन दिवसांत दाेन लाखांचा दंड केला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांवर धडक कारवाई करीत फक्त ३ दिवसांत ७६७ जणांवर कारवाई करून २ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त नाईकवाडे, सहायक आयुक्त व कोरोना समन्वयक गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे.प्रभाग समितीनिहाय सकाळ व संध्याकाळी विशेष मोहीम राबवून मास्क न घालणाऱ्या नागरिक व दुकानदारांविरोधात पोलिसांच्या मदतीने महापालिका अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली असून दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहायक आयुक्त व कोरोना समन्वयक गणेश शिंपी यांनी दिला. १ फेब्रुवारी रोजी १४१ नागरिकांवर तसेच ४ दुकानदारांवर, २ फेब्रुवारी रोजी २५७ नागरिकांवर व १० दुकानदारांवर, तर ३ फेब्रुवारी रोजी ३६९ नागरिक व ६ दुकानदार असे एकूण ७६७ नागरिक व २० दुकानांवर कारवाई करून २ लाखांपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केल्याची माहिती गणेश शिंपी यांनी दिली.महापालिका कारवाईच्या भीतीने नागरिक मास्क वापरत असून अजूनही गर्दीच्या ठिकाणी व दुकानात मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या सरासरी २० पेक्षा कमी असून कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले असून नागरिक व दुकानदार यांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन उपायुक्त नाईकवाडे यांनी केले. प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.दुसऱ्यांदा दिसल्यास गुन्हा दाखल होणारमहापालिका आरोग्य विभागाने कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी शांतीनगर येथील खासगी रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्त्वावर घेतले आहे. तसेच आरोग्य केंद्र तैनात ठेवून कोरोनाकाळात उभ्या केलेल्या कोणार्कजवळील लॅबमध्ये २४ तास कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.