शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

महापालिकेची प्लास्टिकबंदीच्या विरोधात पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:24 IST

3.44 लाखांचा दंड केला वसूल, 13 टन प्लास्टिक जप्त, 1235 दुकानांवर झाली कारवाई

ठाणे : मागील काही दिवसांपासून थांबलेली प्लास्टिकबंदीची कारवाई ठाणे महापालिकेमार्फत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १३.७७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ३.५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली. कारवाई करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत.

या कारवाईअंतर्गत मानपाडा प्रभाग समितीमधून एकूण ३०००० रु पये दंड व ८३ किलो प्लास्टिक, तर नौपाडा प्रभाग समितीत एकूण ३५००० रु पये दंड व १२० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकूण ८० कर्मचारी कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बिसलेरी इंटरनॅशनल प्रा.लि. ही संस्था पालिका क्षेत्रात महापालिकेच्या मान्यतेने बिसलेरी बॉटल फॉर चेंज प्रोग्राम हा उपक्र म राबवत आहे. यामध्ये या संस्थेने पाच ठिकाणी प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचे संकलन केंद्र उभारले असून स्वत:चे वाहन वापरून ते बाटल्या संकलन करत आहेत. संकलित बाटल्या मान्यताप्राप्त पुनर्चक्रीकरण केंद्रात पाठवल्या जातात.या बिन्स मासुंदा तलाव, उपवन तलाव, टीएमटी बसस्थानक, सॅटीस, डी. मार्ट, घोडबंदर रोड व बेडेकर महाविद्यालय ठाणे येथे उभारण्यात आल्या आहेत. ही संस्था स्त्रीमुक्ती कचरावेचक संस्थेच्या समन्वयाने काम करत असून आॅगस्ट २०१८ मध्ये एकूण १४८७ किलो प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. दरम्यान, प्लास्टिकबंदीप्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने महापालिकेने सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये शासननिर्णयाद्वारे, बंदी असलेल्या व वापरण्यास मान्यता असलेल्या प्लास्टिक, थर्माकोल वस्तूंचे जनजागृतीपर फलक उभारले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका