शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून बांगलादेशात पसार झालेला आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:28 IST

पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून या पथकाने त्याला ३१ डिसेंबर रोजी अटक केली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईपालघरच्या वालीव पोलिसांच्या केले हवालीमृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत दिला होता फेकून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकून बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख (४५, रा. बांगलादेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्याला पालघरच्या वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, कैलास सोनवणे, हवालदार मोरे, रवींद्र पाटील आणि नरसिंग महापुरे आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सॅटिसखाली सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याने डिसेंबर २०१७ मध्ये त्याची पत्नी पॉली हिचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तातिवली खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकला होता, अशी कबुलीही त्याने या पथकाला दिली. विशेष म्हणजे त्याने केलेल्या खुनानंतर त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचा सांगाडा दोन वर्षांनी म्हणजे २१ मार्च २०१९ रोजी पालघरच्या वालीव पोलिसांना मिळाला. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याला आता वालीव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.........................निकेत कौशिक यांनी दिले होते आदेशगेल्या तीन वर्षांतील खून आणि मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी दिले होते. पालघरमध्ये २०१७ मधील दोन, २०१८ मधील सहा आणि २०१९ मधील आठ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. ठाणे शहर पोलिसांमुळे आता २०१७ मधील दोनपैकी एका खुनाचा छडा लागल्यामुळे आता ही संख्या एकवर आली आहे. तर ठाणे ग्रामीणमधील गेल्या तीन वर्षांतील १४ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचेही आदेश कौशिक यांनी दिले होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून