शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीला भाईंदरमध्ये पकडले

By धीरज परब | Updated: September 6, 2023 20:27 IST

नवघर पोलिसांनी त्याला जे जे मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . 

मीरारोड - मुंबईच्या जे जे रुग्णालयातून उपचारासाठी दाखल असलेला आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळाला असता त्याला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी ४ तासात पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले . 

रिक्षा चालवणारा आरोपी विवेक विश्वनाथ तोरडे (२६ ) रा. इंदिरानगर झोपडपटटी, भाईंदर पूर्व ह्याने तो रहात असलेल्या परिसरात मे महिन्यात मध्यरात्री नंतर घरात शिरून एकाचा मोबाईल बळजबरी लुटून नेला होता . तर अन्य चार घरांचे मध्यरात्री नंतर दार उघडे पाहून आतील मोबाईल चोरले होते . नवघर पोलिसांनी दाखल केलेल्या त्या ५ गुन्ह्यात तोरडे ह्याला अटक केल्या नंतर त्याच्या कडून ९ मोबाईल व रोख हस्तगत केली होती . न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्या ने त्याला तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते .  मात्र प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने त्याला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . परंतु उपचारा दरम्यान बुधवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास तो नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला . 

आरोपी हा भाईंदरचा राहणारा असल्याने  जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कलीम शेख यांनी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना आरोपी पळून गेल्या बाबतची माहिती दिली.  पवार यांनी त्वरित गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक संदिप पालवे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे सह  भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांना तोरडे याचा शोध घेण्यास रवाना केले . त्यांच्या सोबत जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे प्रितेश शिंदे, संदिप भेरे देखील होते . पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला असता नवघर स्मशानभूमी येथून दुपारी २ च्या सुमारास त्याला पकडले . 

 

टॅग्स :mira roadमीरा रोड