शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘आरोपी दत्तक योजना’

By admin | Updated: March 30, 2017 06:36 IST

आपण ऐकून असाल की, बाळ दत्तक योजना. परंतु, एखाद्या गुन्हेगाराला दत्तक घेतलेले ऐकलेले नसेल. मात्र,

पंकज रोडेकर / ठाणेआपण ऐकून असाल की, बाळ दत्तक योजना. परंतु, एखाद्या गुन्हेगाराला दत्तक घेतलेले ऐकलेले नसेल. मात्र, ठाणे शहर पोलिसांनी चक्क आरोपीच दत्तक घेतले आहेत. पोलीस आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांत आरोपी दत्तक योजनेंतर्गत एका कॉन्स्टेबलला एका आरोपीवर लक्षच नाही, तर त्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या हालचालींवर डोळ्यांत तेल टाकून नजर ठेवायची आहे. शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांची जशी टॉप-२० यादी तयार केली होती, तशी यादी दत्तक योजनेत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे शहरासह राज्यात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. याचदरम्यान, ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार परमबीर सिंग यांनी घेतल्यावर त्यांनी सोनसाखळी चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी टॉप-२० ही संकल्पना आयुक्तालय कार्यक्षेत्रात राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत रेकॉर्डवरील सर्वच सोनसाखळी चोरट्यांची यादी तयार करून त्यांची माहिती गोळा करून तिची इतर पोलीस दलामध्ये देवाणघेवाण करण्याचे काम केले. त्यामुळे सहज या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. नुकतेच ठाणे पोलिसांनी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’ हाती घेतली आहे. ही योजना आयुक्तालयात सुरू करताना प्रत्येक पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलवर एक आरोपीवर वॉच ठेवण्याची जबाबदारी टाकली आहे. जेथे जास्त गुन्हे घडतात, त्या ठिकाणी एका कॉन्स्टेबलला दोन किंवा तीन गुन्हेगारांची जबाबदारी दिली. यामध्ये आरोपीचा फोटो, त्याचे नातेवाईक तसेच त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असेल, तर ते ठिकाण, जेलमध्ये असेल तर त्याचे ठिकाण, अशी माहिती गोळा करताना, एखाद्या वेळी त्याला ताब्यात घ्यावयाचे असेल, तर तो कुठे मिळेल, याचीही माहिती घ्यावयाची जबाबदारी कॉन्स्टेबलवर सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.‘‘ही योजना या वर्षी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्थानिक पातळीवरील दादांवर प्रामुख्याने वचक राहणार आहे. तसेच आपल्यावर पोलिसांची नजर असल्याने तेही भीतीच्या सावटाखाली राहतील. तसेच त्यांना पकडणेही सहज शक्य होईल.’’ - परमबीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे शहर