शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंधनानुसार पेट्रोल, डिझेल वाहनांवर रंगीबेरंगी स्टिकर म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहेत. हे निर्देश नुकतेच दिले असले तरी त्याबाबत अद्याप कल्याण आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.

आरटीओ अधिकाऱ्यांनाच जिथे याबाबत माहिती नाही तिथे सामान्य वाहन चालकांना या बदलाबद्दल माहिती नाही हेदेखील चाचपणी केली असता स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्राने हा बदल का केला आहे, त्याचे महत्त्व काय, त्यातून काय साध्य होणार, हे सगळे प्रश्न अनुत्तरित असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कल्याण आरटीओच्या हद्दीत जरी ८ लाख ११ हजार ६३५ विविध इंधन वाहनांची नोंद असली तरीही केंद्राच्या निकषानुसार हिरवा, निळा, नारिंगी या बदलांबाबत मात्र जनजागृतीही नसल्याने हे बदल कधी अंमलात येतील हे आताच सांगणे कठीण आहे. त्यातही पेट्रोलसाठी निळे, डिझेलसाठी नारिंगी असे स्टिकर लावण्यात येणार असल्याबाबतही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

--------------

आरटीओ क्षेत्रातील एकूण वाहने - ८ लाख ११,६३५

पेट्रोलवर चालणारी वाहने - ६ लाख ६७,१९६

डिझेलवर चालणारी वाहने - ६७ हजार ३९६

पेट्रोल/सीएनजी : ७३ हजार २८९

सीएनजी वाहने - २,४६६

पेट्रोल/ एलपीजी : ९५१

इलेक्ट्रिक/ बॅटरी वाहने - ६०४

एलपीजी : १८

-------------------

कोणत्या गाड्यांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर?

पेट्रोल व सीएनजी - फिक्का निळा

इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहने - हिरवा

डिझेल वाहने - नारिंगी

याबाबत केंद्राचे निकष असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या संकल्पनेबाबत अद्याप तरी कल्याण आरटीओ अनभिज्ञ असल्याचे मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले.

---------------

प्रतिक्रिया :

कल्याण आरटीओ हद्दीतील एकूण इंधन प्रकारानुसार वाहनांची नोंद केली आहे. मात्र इंधनानुसार वाहनांना वेगळे स्टिकर लावण्यासंदर्भात आताच सांगता येणार नाही. कोविड काळात राज्य शासनाने पोलिसांच्या मदतीने अत्यावश्यक वाहनांसह विशेष सूट दिलेल्या रंगसंगतीच्या स्टिकरसंदर्भात माहिती होती. त्या-त्या वेळच्या सूचनांनुसार आम्ही ते वाहनांना लावलेत की नाही याची पाहणीसुद्धा केली होती. आता केंद्राचे निकष असतील तर ते आमच्यापर्यंत आल्यावर त्याचीही तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.

- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण