शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
3
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
4
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
5
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
6
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
7
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
8
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
9
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
10
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
12
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
13
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
15
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
16
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
17
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
18
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
19
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
20
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे पिलर वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला अपघात; ठाणे ते घाेडबंदर वाहतूक सहा तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 20:21 IST

भल्या पहाटे ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शथीर्चे प्रयत्न केले.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे- घोडबंदर वाहिनीवर वर्सोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर करपे कंपाऊंड जुना टोल नाका येथे मेट्रोच्या कामाचे सिमेंटचे गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला रविवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यामुळे पिलरसह हा ट्रेलर रस्त्यावर आडवा झाला होता. त्याला दुसऱ्या पुलरच्या मदतीने बाजूला घेण्यात आले. तोपर्यंत ठाणे ते घाेडबंदर मार्गावर तब्बल सहा तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चालकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, भल्या पहाटे ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शथीर्चे प्रयत्न केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.

घोडबंदर वाहिनीवर वर्सोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर करपे कम्पाउंड जुना टोल नाका येथे मेट्रोच्या कामाचे सिमेंटचे गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाचे पहाटे पावणेतीनच्या सुमारास नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रेलर रस्त्यावरच गर्डरसह आडवा झाला. या ट्रेलरची आणि गर्डरची लांबी मोठी असल्यामुळे संपूर्ण रस्ताच बंद पडला. त्यामुळे ठाणे ते घाेडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक बंद पडली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कासारवडवली, कापूरबावडी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या पुलरची मदत घेतली. त्याच पुलरच्या मदतीने हा ट्रेलर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाणे ते घाेडबंदर आणि घाेडबंदर ते ठाणे अशी दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. मात्र सर्वाधिक फटका ठाणे ते घाेडबंदर मागार्ला बसला. बॅक लॉक वाढल्यामुळे साधारण तीन तासांनी म्हणजे पहाटे पावणेसहाच्या सुमारास हा ट्रेलर बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

गायमुखजवळही ट्रक बंद पडलागायमुखजवळ एक ट्रक सकाळी सव्वासतच्या सुमारास बंद पडला होता. या ट्रकमधील चालक आणि क्लिनर चक्क झोपले होते. त्यांना उठवून हा ट्रक पुढे नेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पाेलिसांनी सुरळीत केली. ओवळा, कासारवडवली आणि आनंदनगर भागात घोडबंदरकडे जाणारी वाहतूक सकाळी साडेआठ नंतर हळूहळू सुरळीत झाली. त्यानंतर नीरा केंद्र,गायमुख घाटातही ठाणे ते घोडबंदर रोडवर कोंडी झाली होती. काशिमिराच्या हद्दीमध्ये वाहतूक थांबवून ठाणे- घोडबंदर वाहिनीवर जाणारी आणि येणारी वाहिनी दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सकाळी ७ ते ९ या दरम्यान करण्यात आले. त्याचवेळी गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर रस्ता दुरुस्तीचेही काम सुरु हाेते. त्यामुळेही वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडली. 

टॅग्स :thaneठाणे