शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून 'तो' बचावला: शस्त्रक्रिया करुन काढली कामगाराच्या पायातील सळई

By जितेंद्र कालेकर | Updated: January 15, 2024 20:02 IST

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळलेल्या कामगाराच्या कंबरेत आणि पायांमध्ये शिरली सळई

ठाणे: वर्तकनगर येथील रौनक रेसिडेन्सी या बांधकाम सुरु असलेल्या तळ अधिक २६ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन कोसळून भीमनगर येथील जयराव सरदार (१९) हा तरुण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. सुदैवाने, या घटनेत तो बचावला असून त्याच्या कंबरेतून आत शिरलेली सळई सुरुवातीला कटरने काढण्यात आली. त्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन उर्वरित सळई बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्तकनगर, भीम नगर येथे रौनक रेसिडेन्सी इमारत क्रमांक-५४ या तळ अधिक २६ मजली इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणीइमारतीच्या बाजूने बांधकामाकरिता उभारलेल्या लोखंडी सळ्यावरती जयराव हा तरुण पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी  धाव घेतली. त्यावेळी जयराव हा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली तळमजल्यावर कोसळल्यानंतर त्याच्या दोन्ही पायांमध्ये लोखंडी सळ्या गेल्याचे आढळले.

त्या सळ्या तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने कट करण्यात आल्या. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पार्श्वभागासह पायात रुतलेली सळई बाहेर काढण्यात आली. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. तो या इमारतीचा कामगार नसूनही तिथे नेमकी कोणत्या कारणांसाठी शिरला होता, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.