शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब पडून पोकलेन कोपर उड्डाणपुलाखाली कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:23 IST

दुसरी क्रेन आणून पोकलेन उचलणार

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: येथील धोकादायक कोपर उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणीला १७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून त्या कामाचा एक भाग असलेल्या राजाजीपथ रस्त्यावरील अंडरपासचा स्लॅब तोडण्याचे काम पोकलेनने करण्यात येत होते. त्या कामादरम्यान स्लॅबसकट २० टन वजनाचा पोकलेन पूलाखालील राजाजी रस्त्यावर पडल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी घडली. त्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी घडली नाही.अपघातानंतर तातडीने ड्रायव्हरला उपचारासाठी हलवण्यात आले, त्याच्या पायाला खरचटले असल्याचे सांगण्यात आले. महापालिका अधिका-यांच्या माहीतीनूसार पुष्पक रेल कॉर्पोरेशन प्रा. लि.कंपनीने हे काम हाती घेतले असून महाापलिकेचे शहर अभियंता, प्रकल्प अभियंता, सह अभियंता यांच्या देखरेखीखाली ते काम सुरु आहे. महापालिका अभियंत्यांच्या माहितीनूसार ते काम १९८० च्या दशकातील पूर्वापार केलेले असून ते बीम होते ते वेगवेगळे होेते. त्यामुळे पोकलेन त्यावर उभा राहुन काम होत असतांना स्लॅब तुटला, स्लॅबने बीम देखिल सोडले आणि ते राजाजीपथ रस्त्यावर खाली कोसळले. अशा पद्धतीने पूर्वी काम झाले असेल याची कल्पनाही नसल्याने ते एवढी वर्षे कसे टिकले याबद्दल अधिकारी वर्गामध्ये आश्वर्य व्यक्त करण्यात येत होते.अखेरीस संध्याकाळी एका अन्य क्रेनच्या सहाय्याने खाली पडलेली पोकलेन उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, संध्याकाळी 7नंतर क्रेनच्या सहाय्याने, पडलेल्या पोकलेन उचलणे, बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरु करण्यात आले होते. परंतु रात्री 9 पर्यन्त ते काम होण्यात अडथळे येत होते. पोकलेनचे फारसे नुकसान झाले नसून ती सुरक्षित आहे, फक्त सरळ करून उचलावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील टप्प्यात राजीजी पथ रस्त्यावर कोसळलेला मलबा उचलण्यात येणार असून अंडरपासचा अन्य दुसरा स्लॅब कशा पद्धतीने सुरक्षितरीत्या काढायचा त्याचे नियोजन करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी आमदार रवींद्र चव्हाण, स्थानिक नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश अहेर, वाहतूक पोलीस निरिक्षक सतेज जाधव, महापालिकेचे सह अभियंता शैलेश मळेकर यांच्यासह अधिका-यांनी भेट दिली होती. सहाय्यता करायला येणा-या क्रेनचे वजन देखिल २० टन असून पडलेली पोकलेन २० टनांची आहे, ती काढतांना सध्याचा पूलावरील अ‍ॅप्रोच रस्ता चांगला आहे की नाही, अन्यथा तो खचायचा. त्यामुळे त्याच्या क्षमतेची एकदा पाहणी करून मग निर्णय घ्यावा असे चव्हाण यांनी कंत्राटदाराच्या कर्मचा-याशी बोलतांन सांगितले.* दरम्यान, या पूलावरून पश्चिमेला सुमारे ५० हजार ग्राहकांना वीज पुरवठा करणारी महावितरणची उच्च दाब वाहिनी जाते, त्या वाहिनीला काही झाले नाही ना याची पाहणी करणे, आणि ती सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या. त्या वाहिनीला काही इजा झाल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते, मोठा अपघात होऊ शकतो. तसेच पश्चिमेकडील ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भूमिगत केबल टाकण्याचे काम जलद गतीने आणि दर्जेदार करण्यात यावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.