शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत अन वृक्ष प्राधिकरण सदस्यांची नावे वादात

By admin | Updated: April 21, 2017 00:12 IST

महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ब्रेक लावल्याने त्यामुळे दुखावलेल्या पालिका

ठाणे :महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ब्रेक लावल्याने त्यामुळे दुखावलेल्या पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीसह स्वीकृत सदस्यांच्या निवडीत खोडा घातल्याची बाब गुरुवारी झालेल्या महासभेच्या निमित्ताने समोर आली. वृक्ष प्राधिकरण सदस्य निवडीचा विषय सर्वसाधारण सभेतून मागे घेतल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांची निवड तांत्रिक आणि कायदेशीर मुद्यांचा आधार घेऊन आयुक्तांनी त्याबाबतची शिफारस करणे टाळले आहे. परंतु, असे असतानाही पीठासीन अधिकारी तथा महापौरांनी स्वीकृत सदस्यांची नावे वाचल्याने आता त्यांच्या पुढील अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे आहेत. एक ते दीड वर्षापासून पालिका आयुक्तांच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरूआहे. निवडणुकीपूर्वी थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु, मनोरमानगर येथील रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असता, महापौर शिंदे यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर, आयुक्तांनी हे काम तडकाफडकी बंद केले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनात वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अचानक कारवाईला ब्रेक लागल्याने आयुक्त अस्वस्थ झाले होते. मात्र, त्यामुळे हतबल न होता जशास तसे उत्तर देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.त्यानुसार, पालिकेतील वृक्ष प्राधिकरण आणि स्वीकृत सदस्यपदासाठी २० एप्रिल म्हणजेच गुरुवारी निवड केली जाणार होती. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नगरसेवकांसह तांत्रिक समितीमधील सदस्यपदावरही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची तयारी झाली होती. मात्र, १८ तारखेला अचानक पालिका आयुक्तांनी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य निवडीचा विषय मागे घेऊन राजकीय नेत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर, पाच स्वीकृत सदस्यांसाठी अर्हता कायद्यात नमूद केलेली असून राजकीय पक्षांनी ज्या सदस्यांची नावे सुचवली आहेत. ती या पदासाठी पात्र नसल्याचे प्रशासनाचे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)