शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यांचा चेंडू नगरविकासकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:51 IST

दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने संबंधितांची सुनावणी घेतल्यावर ८ आठवड्यांत निर्णय देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी नितीन मुणगेकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा चेंडू आता शिंदे यांच्या कोर्टात दाखल झाला आहे. दरम्यान, आधीच सदस्य नियुक्तीला विलंब झाला असून आता जेमतेम १५ महिन्यांचा कालावधीच शिल्लक आहे.ऑगस्ट २०१७  मध्ये महापालिका निवडणुका होऊनही स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत भाजप व पालिका प्रशासनाने विलंब केला. कारण, भाजपच्या कोट्यात तीन सदस्य असताना चौघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. स्वीकृत सदस्य नेमण्याबाबत निकष असताना भाजप, प्रशासनासह शिवसेना आदींनी जवळीकांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या वतीने ठाणे - पालघर भाजपा उपाध्यक्ष अनिल भोसले, माजी नगरसेवक भगवती शर्मा, निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह व काँग्रेसचे माजी नगरसेवक ॲड. शफिक खान यांची नावे निर्देश धुडकावून निश्चित केली.महासभेत भाजपने सेनेच्या उमेदवाराच्या नावाला कात्री लावत भाजपचे तीन व काँग्रेसच्या एका उमेदवारास नेमण्याचा ठराव केला. याप्रकरणी आ. गीता जैन यांनी तक्रार केली  असता, नगरविकास विभागाने स्थगिती दिली होती. दरम्यान, मुणगेकर यांनी या नियुक्त्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या केल्या गेल्या नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने स्वीकृत सदस्य नेमण्यास स्थगिती दिली होती.चार आठवडे अंमलबजावणी नाहीभाजपचे उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपच्या भोसले, शर्मा व पाटील या तिन्ही उमेदवारांनी उच्च न्यायालयात याबाबत राज्य सरकार, नगरविकास मंत्री, महापौर, आ. जैन व मीरा-भाईंदर महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. शिंदे यांनी सुनावणी घेऊन ८ आठवड्यांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा. निर्णय दिल्यानंतर चार आठवड्यांपर्यंत त्याची अंमलबजावणी करू नये, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.