शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्य निवड : भिवंडीमध्ये घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:38 IST

महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांसाठी सर्व पक्षांत चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी या अर्जांची आयुक्त मनोहर हिरे यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी केली.

भिवंडी - महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांसाठी सर्व पक्षांत चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी या अर्जांची आयुक्त मनोहर हिरे यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी केली.पालिकेत एकूण ९० नगरसेवक निवडून आले असून पक्षीय बलानुसार काँग्रेसने तीन, शिवसेना एक व भाजपा एक अशी पाच स्वीकृत सदस्यांची शिफारस नगरसेवकांना करायची आहे. वास्तविक, नियमानुसार माजी सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, उच्च अभियांत्रिकी, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीची शिफारस करणे अपेक्षित आहे. परंतु, काही वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी किंवा घोडेबाजाराने स्वीकृत सदस्यांची निवड होत असल्याचे दिसून आले आहे.यावेळी पालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांसाठी जयंत घुले, हर्षल पाटील, कृष्णा गाजेंगी, डॉ. नुरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी, मधुकर जगताप, शरद भसाळे, जावेद एफ. आझमी, डॉ.मो. आसीफ युनूस फारुखी, देवानंद थळे, मोह. साजीद अश्फाक खान, सिद्धेश्वर कामूर्ती,राहुल खटके अशा १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.या उमेदवारांच्या अर्जांची शनिवारी आयुक्त हिरे यांच्या दालनात छाननी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल शिवसेना गटनेते संजय म्हात्रे, काँग्रेस गटनेते हालीम अन्सारी, सभागृह नेते प्रशांत लाड, भाजपा गटनेते निलेश चौधरी आणि नगरसचिव बिपिन सापटे उपस्थित होते.दरम्यान, या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागलेले आहे. पक्षांकडून रणनिती आखणे सुरू आहे.शहराबाहेरील उमेदवारांची अडचणयावेळी सरकारी नियमानुसार स्थानिक उमेदवारांच्या वर्गवारीप्रमाणे सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अग्रवाल यांनी आयुक्तांकडे केली. त्यामुळे शहराबाहेरील उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे.शिवसेनेने शहराबाहेरील उमेदवार दिल्याने शहरातील शिवसैनिकांनी याआधीच नाराजी व्यक्त केली होती. तर, काँग्रेसच्या जुन्या व अनुभवी उमेदवारांना संधी न देता नुकत्याच काँगे्रसमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारांना स्वीकृत सदस्यासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे शहरातील जुन्याजाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या स्वीकृत सदस्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण