शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला एक तपानंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 06:26 IST

१२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ च्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली.

ठाणे : डोंबिवलीतील शैलेंद्रसिंह शेखावत (२७, रा. जयपूर, राजस्थान) याचा खून करून १२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ च्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली. मध्य प्रदेश विशेष कृती दलाच्या मदतीने चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.शैलेंद्रसिंह काही पैशांच्या मोबदल्यामध्ये सुशिक्षित तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे काम करत होता. डोंबिवलीतील नरेंद्रसिंग राजावत (मूळ रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्य प्रदेश) आणि पिंटूसिंग राजावत (मूळ रा. मध्य प्रदेश) यांच्याकडूनही त्याने पैसे घेतले होते. परंतु, त्यांना त्याने नोकरीही लावली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याच कारणावरून नरेंद्रसिंग, पिंटूसिंग, राजकुमार आणि रिषी डॅग यांनी शैलेंद्रसिंह याचा डोंबिवलीमध्ये गळा आवळून खून केला होता. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शालीमध्ये गुंडाळून तो नाल्यामध्ये फेकून पलायन केले होते. याप्रकरणी २१ मार्च २००७ रोजी विष्णुनगर पोलीसांत राजकुमारसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.फरार आरोपी राजकुमार हा मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील महेंदवा या त्याच्या मूळगावी असल्याची माहिती खबऱ्यांच्या मार्फत मिळाली. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींच्या पथकाने मध्य प्रदेशातील चंबळ खोºयात प्रत्यक्ष १५ दिवस मुक्काम करून सापळा लावला. स्थानिक भिंड जिल्ह्यातील असवाल पोलिसांसह एसटीएफचीही यावेळी मदत घेण्यात आली. अखेर, राजावतला १५ एप्रिल रोजी या पथकाने ताब्यात घेतले. राजावत याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या इतरही साथीदारांचा शोध सुरू आहे.न्यायालयाचा जाहीरनामाखुनानंतर सर्व आरोपी पसार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कलम २९९ नुसार १३ मे २००८ रोजी पुराव्यानिशी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामा काढला होता. त्याच अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यातील फरारी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला सुरुवात केली.