शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

...अबब ३६ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:24 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले.

पंकज पाटील अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले. त्यातील ८० टक्के खर्च करण्यात आहे. मात्र, असे असतानाही शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल ३६ टक्के पाणीगळती आहे. नव्याने योजना तयार केल्यास पाणीगळतीचे प्रमाण कमी होईल, असा दावा अधिकारी करत असले, तर यापूर्वी खर्च झालेला पैसा पाण्यात गेल्यात जमा आहे.अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १९२३ मध्ये उल्हास नदीवर बॅरेज धरण उभारून योजना कार्यान्वित केली गेली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची सध्याची लोकसंख्या ही सहा लाखांच्या घरात आहे. दोन्ही शहरांना दररोज १०६ दशलक्ष लीटर्स एवढा पाणीपुरवठा होत आहे. अंबरनाथमध्ये शहरी भागाकरिता दररोज ४७ दशलक्ष लीटर्स पाणी, तर आयुध निर्माण कारखान्यासाठी आठ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. म्हणजे दररोज ५५ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून सरासरी ४६ , एमआयडीसीकडून १० आणि चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लीटर्स असे एकूण ६२ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. मात्र, पाणी योजनेतील त्रुटीमुळे तब्बल २० दशलक्ष लीटर्स म्हणजे सरासरी ३६ टक्के पाण्याची गळती होते आहे. पाणीगळतीचा विचार करता अंबरनाथ शहराला १२ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरणाने आपल्या पाणीगळतीचे प्रमाण ३६ टक्क्यांवरून १५ ते २० टक्क्यांवर आणले, तरी शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाने गळती रोखण्यासाठी ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळेच पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही पाणीसमस्येला तोंड देण्याची वेळ अंबरनाथकरांवर ओढवली आहे.बदलापूरचीही तीच अवस्था आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता शहराला दररोज ३४ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून तब्बल ४३ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. सरासरी नऊ दशलक्ष लीटर्स पाणी जास्तीचे उचलण्यात येत असले, तरी जीवन प्राधिकरणाने योजना अयोग्य पद्धतीने हाताळल्याने १२ दशलक्ष लीटर्स म्हणजे तब्बल ३६ टक्के पाणीगळतीचे प्रमाण ठेवले आहे. बदलापूरला गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची गळती जास्त असल्याने शहराला तीन दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाण्याची गरज आहे. ही तूट भरून निघत नसल्याने शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अंबरनाथची पाणीपुरवठा योजना अपुरी : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुसूत्रता यावी, यासाठी नगरोत्थान प्रकल्पांतर्गत ७७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. पाण्याची गळती जास्त असल्याने या योजनेत नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ प्रस्तावित केले होते. मात्र, ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. या योजनेला १३ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत काम पूर्ण झाले नाही, हेच या योजनेचे अपयश म्हणावे लागेल. पहिलीच योजना अपूर्णावस्थेत असताना शासनाने अमृत अभियानांतर्गत नव्याने ५७ कोटींची योजना मंजूर केली.२०१६ मध्ये या कामाचे आदेश दिले. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेत नवीन जलवाहिन्या प्रस्तावित आहेत. मात्र, नवीन जलवाहिन्या टाकूनही पाण्याची गळती रोखता येत नसल्याने प्राधिकरणाचे नियोजन चुकत आहे, हे स्पष्ट होत आहे.कुळगाव-बदलापूर शहरांसाठी शासनाने नगरोत्थान योजनेतून ८१ कोटींची योजना मंजूर केली होती. त्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, तरीदेखील शहरातील पाणीगळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. मूळ योजना ही शहरातील टोकावरील भागांना पाणीपुरवठा करण्याबरोबर गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी तयार केली होती. मात्र, त्यात अपयश आले आहे. या योजनेतील अपयश समोर असतानाच अमृत अभियानांतर्गत नव्याने ६७ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतील जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील निकृष्ट झाल्याने या योजनेचे काम पूर्ण झाल्यावरही पाण्याची गळती कमी होईल, अशी अपेक्षा राहिलेली नाही. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असली, तरी दोन्ही शहरांची योजना ही जीवन प्राधिकरण सांभाळत आहे. जीवन प्राधिकरण पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ असले, तरी वितरण व्यवस्थेत अपयशी ठरल्याचे अंबरनाथ आणि बदलापुरात स्पष्ट दिसत आहे. दोन्ही शहरांसाठी २८० कोटींपेक्षा जास्तनिधी दिलेला असतानाही योजनेतून काहीच साध्यझालेले नाही. नवीन वस्त्यांना पाणीपुरवठा करत असताना अस्तित्वातील योजनेतील पाण्याची गळती मात्र रोखता आलेली नाही.