अनगाव : मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासठी गेलेल्या विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना शहरातील आझादनगर येथे घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसात तक्र ार नोंदविण्यात आली आहे. मन्नत शहाबानू जमील अहमद शहा असे अपहरण केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बारावीत शिक्षण घेत आहे. आझादनगर येथील रजिया बानू शाह यांची मुलगी मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी गेली होती. ती परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र ती सापडली नसल्याने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. (वार्ताहर)
विद्यार्थिनीचे अपहरण
By admin | Updated: February 17, 2017 02:01 IST