शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देश सोडून जाण्यावरून आमिरवर टीका

By admin | Updated: November 25, 2015 01:41 IST

आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून

ठाणे : आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून देणाऱ्या आमिरला अचानक हा देश असहिष्णु कसा वाटू लागला व देश सोडून जाण्यासारखी टोकाची भाषा तो का करु लागला, असा येथील काही कलाकार व त्याचे चाहते करु लागले आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅपवर त्याला लक्ष्य केले गेले आहे.देशात असहिष्णुता माजली आहे. त्यामुळे माझी पत्नी किरण हिला मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे याचीही भीती वाटत आहे ही आमिरने व्यक्त केलेली भीती शुद्ध वेडेपणा असल्याचे अभिनेता मोहन जोशी यांनी सांगितले. आमिर खानला जर भारतात भीती वाटते तर ज्या देशात सुरक्षित वाटते त्या देशात आजच्या आज रात्रीचे तिकीट काढावे आणि चालू पडावे. तो गेल्याने हिंदी चित्रपट सृष्टीला काहीही फरक पडणार नाही. असे कित्येक लोक येतात आणि जातात. भारताची लोकसंख्या करोडोंची आहे या सर्व लोकांना भीती वाटत नाही तर मर्सिडीज गाडीतून फिरणाऱ्या आमिर व शाहरूखला कशाची भीती वाटते असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला.देशात असहिष्णुता माजली असताना सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. त्याचे पडसाद म्हणून असह्यतेतून लेखकांनी पुरस्कार परत केले आहेत. हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे. आमिर खानला पुरस्कार परत करणे योग्य वाटते . हे त्याचे वैयक्तीक मत आहे, असे म्हणावे लागेल. परंतु भारत हा माझा देश आहे. तिथे जर काही गोष्टी योग्य घडत नसतील तर भारताबाहेर जाण्याची भाषा करणे योग्य नाही. देशात राहूनच परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत लेखक आनंद म्हसवेकर यांनी व्यक्त केले. आमिरला असे वाटणे फारच दुर्दैवी आहे. हे फारच नकारात्मक बोलणे आहे. आमिरसारख्या सेलीब्रेटीने असे बोलणे म्हणजे देशाची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे, असे मत दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केले.यापूर्वी भारतात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. निर्घृण हत्या झाल्या आहेत. तेव्हा आमिरला कधी असे वाटले का नाही? त्याचे हे विधान बेजबाबदार नागरिकाचे आहे, अशी टीका लेखक हृषीकेश कोळी यांनी केली.