शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील सारंगगाव मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:54 IST

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात.अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा,यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासना कडून जनजागृती,मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.

नितीन पंडितभिवंडी : एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला असला तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन घडले.या मतदान केंद्रावर पारंपरिक पद्धतीचा पेहराव केलेले केंद्र प्रमुख व कर्मचारी दिसून आले. तर, केंद्राच्या बाहेर टोपल्या,बोट,रांगोळी काढण्यात आली होत्या.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात.अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा,यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासना कडून जनजागृती,मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. असे असताना, दुसरीकडे यंदाच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात तेथील संस्कृतीवर आधारित एक आगळेवेगळे मतदान केंद्राची निर्मिती करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३२१ येथे  वैशिष्ठ्यपूर्ण मतदान केंद्र बनविण्यात आले होते. या गावात ६६८ मतदार आहेत.

या मतदान केंद्रावर कोळी आगरी समाजाची छाप दिसून आली.या मतदान केंद्रावर मासळी पकडण्या साठी वारण्यात येणारे जाळी, मासळी विक्री साठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी काढण्यात आल्याचे दिसून आले.तर मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी हे सुध्दा पारंपारिक आगरी कोळी पेहराव्यात दिसून आले.