शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर शिवसेनेच्याच रिक्षाचालकाकडून आत्महत्येचा प्रयत्न

By जितेंद्र कालेकर | Updated: June 17, 2023 15:52 IST

गुन्हा दाखल असतांनाही मागितला रिक्षाचा परवाना: रिक्षाचालक शिवसेनेचा पदाधिकारी

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर विनय पांडे या रिक्षाचालकाने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा शनिवारी सकाळी प्रयत्न केला. निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. प्रादेशिक परिवहन कायार्लयाने (आरटीओ) रिक्षाचा नवीन परवाना देण्यास नकार दिल्याने हताश होऊन त्याने हे टाेकाचे पाऊल उचलले.

मुख्यमंत्रीही एकेकाळी रिक्षा चालवत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची व्यथा कळू शकते, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला परवाना आणि बॅज देण्यात कायदेशीर अडचणी असल्याचे आरटीओकडून त्याला सांगण्यात आले हाेते.ठाण्यातील लुईसवाडी येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शुभदीप साेसायटीच्या बाहेर सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान ठाणे महापालिकेने खरेदी केलेल्या यांत्रिक पद्धतीने सफाई करणाऱ्या दोन यंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्री ठाण्यातून मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेनेच्याच शिंदे  गटाचा पदाधिकारी  असलेला रिक्षाचालक पांडे त्याठिकाणी आला. त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला तसे करण्यापासून अटकाव केला. त्यानंतर त्याला सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पाेलिसांनी वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याने दिली.

आंदोलनाचा गुन्हा असल्याने परवाना नाकारला -रिक्षाचालकांचे २००२ मध्ये आंदोलन झाले होते. याच आंदाेलनाचा र्विनय पांडे याच्या विरुदध गुन्हा दाखल झाला हाेता. त्याने रिक्षाचा नवीन परवाना आणि बॅजची मागणी केली हाेती. मात्र, आंदाेलनाच्या गुन्हयामुळे रिक्षाचा नवीन परवाना त्याला आरटीओने नाकारल्याचे पांडे याचे म्हणणे आहे. हा परवाना नसल्यामुळे घरातही पत्नीसाेबत त्याचे खटके उडत हाेते. यातूनच वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने हे टाेकाचे पाउल उचलल्याचे बाेलले जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे