शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

दुकानात घुसून रोखले पिस्तुल, तीनवेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने दुर्घटना टळली

By धीरज परब | Updated: October 13, 2023 19:45 IST

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्याच्या समोरच एका केक दुकानात हेल्मेट घालून शिरलेल्या हल्लेखोराने पिस्तुल रोखत दुकानातील काऊंटर वर असणाऱ्या च्या दिशेने गोळीबार करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. परंतु गोळी न सुटल्याने जिवीत हानी झाली नाही

काशीमीरा नाक्यावर सनराईज हॉटेल शेजारी इंटरनॅशनल बेकरी नावाचे मोठे दुकान आहे. इब्राहिम यासिन पटेल उर्फ बाबू यांचे हे दुकान आहे.  शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक हेल्मेटधारी तरुण दुकानात शिरला. त्याने पिशवीतून पिस्तुल काढून काऊंटरवर असणाऱ्यांच्या दिशेने रोखले. त्याने तीनवेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण गोळी काही सुटली नाही. त्यामुळे तो बाहेर पडला व दुचाकीवरून त्याच्या साथीदारासह पसार झाला. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक आयुक्त महेश तरडे, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे सह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काशीमीरा व गुन्हे शाखेचे पोलिस तपसास लागले आहेत.

इब्राहिम पटेल यांचे जागे वरून वाद तसेच अन्य काही वादाचे प्रकार आहेत का ? याची चौकशी पोलिस करत आहेत. गोळी खरंच सुटली नाही की घाबरवण्याचा प्रयत्न होता ? अश्या दोन्ही शक्यता पोलिस सूत्रे वर्तवत आहेत.  हल्लेखोर कोणत्या दिशेने आले व कोणत्या दिशेने गेले या माहितीसाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. 

आरोपींच्या दुचाकीवर क्रमांक नसल्याची शक्यता आहे. ते दुचाकीवरून निलकमल नाका कडून दुकाना जवळ आले आणि गोळी झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :mira roadमीरा रोड