शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक 

By धीरज परब | Updated: June 3, 2023 19:30 IST

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. 

मीरारोड - मीरारोड मध्ये एका सराफास शस्त्र दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला अटक करून दोन गावठी कट्टे, १ काडतूस आणि दुचाकी जप्त केली आहे. त्याचा साथीदार मात्र अजून सापडलेला नाही. २७ मे रोजी मीरारोडच्या  विजय पार्क भागात कोठारी ज्वेलर्स मध्ये घुसून दोघा लुटारूंनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोहित कोठारी यांनी दोघांचा प्रतिकार केल्याने ते कोठारी यांचा मोबाईल लुटून पळून गेले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. 

मीरारोड व नवघर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश काळे व हनिफ शेख, उपनिरीक्षक किरण वंजारी व पथकाने तपास करत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली तसेच एका आरोपीचे नाव निष्पन्न केले. गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे व पथकाने आरोपीचा शोध घेऊन आकाश मनोज गुप्ता (२५ ) रा. जनशक्ती सोसायटी, बायशेतपाडा, संतोष भवन, नालासोपारा पूर्व ह्याला काशीमीरा भागातून अटक केली. तर त्याचा साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरु आहे. 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोड