शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोहायला गेलेल्या बारावीच्या विद्याथ्यार्चा ठाण्यातील उपवन तलावात बुडून मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: July 17, 2023 20:13 IST

अग्निशमन दलाने बाेटीच्या मदतीने घेतला शाेध, पाेहता येउनही दम लागल्याने बुडाल्याचा अंदाज

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या उपवन तलावात मित्रांसह पोहायला गेलेल्या १७ वर्षीय आदित्य लक्ष्मण पवार (रा. साई सहकार सोसायटी, लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार) या आर. जे. ठाकूर महाविदयालयातील बारावीतील विदयाथ्यार्चा बुडून मृत्यू झाल्याची साेमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. बाेटीच्या माध्यमातून तब्बल तीन तास शाेध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली.

आदित्य हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत उपवन तलावात पोहण्यासाठी १७ जुलै रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास गेला होता. उपवन तलावाच्या पायलादेवी मंदिराजवळ असलेल्या सेल्फी पाॅईंट येथील कठडयावरुन त्याने उडी घेतली हाेती. ताे विसर्जन घाटाकडे पाेहून जात हाेता. त्याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच दम लागल्याने ताे विसर्जन घाटापयर्ंुत पाेहचलाच नाही. मध्यभागीच ताे बुडाला. त्याच्या मित्रांनी काही अंतर जाउन त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, त्यांना अपयश आले. ही माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाला दुपारी २. १२ वाजण्याच्या सुमारास सागर वर्मा याच्याकडून मिळाल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अ िग्नशमन दलाच्या पथकांनी धाव घेतली. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत दोन बोटींच्या सहाय्याने शोध घेतल्यानंतर आदित्यचा मृतदेह मिळाला. उत्तरीय तपासणीसाठी ताे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी चाैकशी करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे