शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:10 IST

सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे.

ठाणे : शहरातील सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ज्या सोसायट्या कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली. या आठवडाभरात अशा सोसायट्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र गुन्हे दाखल करण्याबरोबरच मे पासून त्यांचा कचरा उचलणे बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायट्या कच-यावर प्रक्रियेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कच-यावर प्रक्रियेसाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायट्या असल्याने अजूनही त्यांनी कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केलेली नाही. महापालिकेने यासाठी अनेक स्तरावर सोसायट्यांची तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन बॅनर तसेच पोस्टर लावून जनजागृती केली. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.>...म्हणून करणार कारवाईठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायट्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवल्या असून ज्या सोसायट्या, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशांनी स्वत:च कच-याची विल्हेवाट लावण्याचे बंधन आहे. सुरुवातीला महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, तरीही प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले. त्यानंतर त्यांना मार्चपर्यंत कचºयाची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत दिली. परंतु,आतापर्यंत केवळ ८ ते १० टक्के सोसायट्यांनी त्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे प्लान्ट निर्माण करून तो चालवण्यासाठी वेळच नसल्याचे काही सोसायट्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता पुन्हा एकदा महापालिकेने नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याचे निश्चित केले आहे. तसेच मे पर्यंत कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केली नाही तर कचरा उचलण्याचेदेखील बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.