शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीत ८६ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाची लस उपलब्ध होताच सहा ठिकाणी असलेल्या आठ लसीकरण ...

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाची लस उपलब्ध होताच सहा ठिकाणी असलेल्या आठ लसीकरण केंद्रातून पहिल्या टप्प्यातील ९६ टक्के लसीकरण पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यातील ५५ टक्के लसीकरण पार पडले असून दोन्ही टप्प्यातील एकूण लसीकरण ८६ टक्के झाले आहे. .

लसीकरण सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांना लस दिली जाणार होती. त्यासाठी सरकारी रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांकडून माहिती मागवून लाभार्थीची ऑनलाइन यादी तयार करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या ९ हजार ७५ होती. त्यापैकी ८ हजार ७२२ जणांनी लस घेतली. त्यामुळे एकूण ९६ टक्के लसीकरणाचे पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्यांनी दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यायचा असल्याने १ हजार २५३ जणांनी लस घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर वर्कर्सचे लसीकरण सुरु झाले. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ८४१ होती. त्यापैकी ३ हजार ७८२ जणांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात ५६ टक्के लसीकरणाचे काम पार पडले आहे.

------------------

आतापर्यंत एकूण ८६ टक्के लसीकरण

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एकूण १५ हजार ९१६ लाभार्थीपैकी १३ हजार ७५७ जणांनी लस घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस घेणाऱ्यांसह आतापर्यंत ८६ टक्के लसीकरण झाले आहे.

-------------------

लस घेतल्यानंतर

लस घेतल्यानंतर अनेकांना अस्वस्थता वाटते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अशा फार कमी केसेस दिसून आल्या. लस दिल्यावर जवळपास तासभर निरीक्षण कक्षात बसवून ठेवले जाते. त्यानंतर त्याला काही त्रास होत नाही, याची खात्री करुन घरी सोडले जाते. त्रास झाल्यास लगेच रुग्णालयात येण्याची सूचना दिली जाते.

-----------------

महापालिकेस सरकारकडून लसीचे २१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रमाण कमी होत असताना आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी स्वत: लस घेऊन लसीकरणाला प्रोत्साहन दिले. त्यानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.

-डॉ. प्रतिभा पानपाटील-वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.

---------------------

लसीकरण केंद्रे आणि लसीकरण

१.रुक्मिणीबाई रुग्णालय-१९७७

२.शास्त्रीनगर रुग्णालय-१७७८

३.शक्तीधाम-१०५०

४.क्रीडा संकुल-६५४

५.एम्स रुग्णालय-४६४

६.होलीक्राॅस-५९२३

-------------------