शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अपंग कविताला ८२ टक्के

By admin | Updated: June 21, 2016 00:52 IST

कविताचे दोन्ही पाय व हात जन्मत:च अपंग, तिला सरकत जाणे ही कठीण त्यातच श्रवणक्षमता कमी तरीही तिची बुद्धी तल्लख होती. मेहनत आणि शिकण्याची प्रबळ इच्छा याच्या जोरावर

राहुल वाडेकर,  विक्रमगडकविताचे दोन्ही पाय व हात जन्मत:च अपंग, तिला सरकत जाणे ही कठीण त्यातच श्रवणक्षमता कमी तरीही तिची बुद्धी तल्लख होती. मेहनत आणि शिकण्याची प्रबळ इच्छा याच्या जोरावर ती अपंगांच्या शाळेत न जाता सर्वसामान्य मुलांच्या शाळेत गेली आणि ग्रामीण भागात राहूनही तिने दहावीच्या परीक्षेत ८१.६० टक्के गुण मिळविले. विक्रमगडच्या कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात शिकणाऱ्या कविता रविंद्र देसले या मुलीची ही कथा. कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाची ही विद्यार्थिनी. जन्मत:च तिचे दोन्ही पाय वाकडे होते, तर हाताच्या मुठी आवळलेल्या होत्या. त्यामुळे आपल्या मुलीचे पुढे कसे होणार, या विवंचनेत असलेल्या तिच्या माता-पित्यांनी धीर न सोडता तिला मुंबईत नेले. नातेवाईकांच्या मदतीने तिच्यावर सलग दोन वर्षे उपचार केले.त्यानंतरही तिचे पाय आजही जमिनीला व्यवस्थित टेकवता येत नाहीत. हातावरील प्रदीर्घ उपचारानंतर केवळ बोटे उघडण्या पुरतेच ते वापरता येतात. अशाही स्थितीत ती अभ्यासाच्या गोडीने माले येथील मराठी शाळेत शिकली. त्यानंतर अपंगांच्या शाळेत न जाता तिने कस्तुरबा गांधी कन्या विधालयात प्रवेश घेतला. तिचे आई-वडील मोलमजूरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात कविताची अभ्यासातील प्रगती पाहून तिचे चुलत भावांनी भरघोस शैक्षणिक व आर्थिक मदत केली. तिच्या घरची परिस्थिती खूप बिकट असल्याने पुढील शिक्षण कसे घ्यायचे हा यक्षप्रश्न तिच्या पुढे उभा राहिला आहे. कवितांचा वैद्यकीय खर्च आता पेलवत नाहीे. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. परंतु तो तिच्या पालकांना परवडणारा नाही. तिला प्रशासकिय अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. आर्थिक परीस्थिती बेताचीच असल्याने तीचे स्वप्न अधूरे राहण्याची शक्यता आहे. तिच्या या स्वप्नांना मदतीचे बल देण्याची गरज निर्माण झाली असून कविताला पुढील शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी अमोल सांबरे- ९२७०२६६६९६, सचिनभोईर- ८४१२०७0१३१, सिद्धार्थ सांबरे-९७६५८२५४५४, रूपेश पाटिल-८६००९५०२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन युवास्पर्श सामाजिक संघटनेने केले आहे.