शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के शाळांना हेडमास्तरच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:27 IST

एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे.

ठाणे : एकीकडे २०१८-१९ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. अत्याधुनिक शिक्षणपद्धती अंगीकारण्यासाठीदेखील पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, असे असतानाही तब्बल ८० टक्के शाळांना सलग तिसऱ्या वर्षी मुख्याध्यापक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटलचे धडे देणे, ई-लर्निंग आदींसह इतर योजना शिक्षण विभागाने हाती घेतल्या आहेत. परंतु, आता तर यंदाचे शैक्षणिक वर्षदेखील सुरू झाले आहे. असे असतानादेखील अद्यापही महापालिका शाळांना मुख्याध्यापक देता आलेले नाहीत.यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये जुन्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदाची सूत्रे दिली होती. परंतु, त्यांना जबाबदाºया मात्र दिल्या नव्हत्या. अनेक शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळेही अनेक शिक्षक जे मुख्याध्यापकांची जबाबदारी सहज पेलू शकतात, तेदेखील यापासून वंचित राहण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.महापालिकेच्या ८१ शाळा इमारती असून त्यामध्ये १२१ शाळा चालवल्या जातात. यामध्ये सुमारे ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्याचे काम १२०० शिक्षक करत आहेत. परंतु, मराठी माध्यमाच्या २९, उर्दू माध्यमाच्या १९ आणि हिंदी माध्यमाच्या ४ अशा एकूण ५२ शाळांना मुख्याध्यापक अद्यापही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.>आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने हा विषय प्रलंबित राहिलेला आहे. परंतु, आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच हा विषय मार्गी लावला जाणार आहे.- विकास रेपाळे, शिक्षण मंडळ अध्यक्ष