शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ताफ्यात ८९ वाहने

By admin | Updated: May 24, 2017 01:06 IST

ठाणे शहर पोलिसांकडील वाहनांच्या ताफ्यात चार कोटी ६५ लाखांच्या ८९ अत्याधुनिक वाहनांची भर पडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते या वाहनांना लवकरच हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे

जितेंद्र कालेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर पोलिसांकडील वाहनांच्या ताफ्यात चार कोटी ६५ लाखांच्या ८९ अत्याधुनिक वाहनांची भर पडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते या वाहनांना लवकरच हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या बिट मार्शलच्या दुचाकींची अवस्था गंभीर झाली होती. अनेक दुचाकींच्या नादुरुस्तीमुळे बिट मार्शलांंना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. पोलीस नियंत्रण कक्षाच्या (पीसीआर) व्हॅनही ३५ पैकी २५ पोलीस ठाण्यांमध्येच उपलब्ध होत्या. केवळ एक पीसीआर व्हॅन उपलब्ध असल्यामुळे अरुंद रस्त्यावरुन गस्तीसाठी पोलिसांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्या दूर करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्य सरकारकडे गस्तीकरिता कारसह दुचाकींचीही मागणी केली होती. शासनाने ही मागणी मान्य करुन एक कोटी ६८ लाखांच्या १४ लाईट व्हॅन, सुमारे दोन कोटी ८० लाखांच्या कार आणि १७ लाख ५० हजारांच्या ३५ मोटारसायकल अशी वाहने ठाणे पोलिसांना दिली आहेत.असा होणार उपयोगठाणे आयुक्तालयातील ३५ पैकी वर्तकनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी २५ पोलीस ठाण्यांमध्ये पीसीआर मोबाईल आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासाठी पीटर १ तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासाठी पीटर २ अशी वाहने उपलब्ध आहेत. नव्या वाहनांमधील ज्याठिकाणी पीसीआर मोबाईल नाही, त्याठिकाणी लाईट व्हॅन दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त सर्वच ३५ पोलीस ठाण्यांना तिसरी अतिरिक्त पीसीआर २ ही अत्याधुनिक कार दिली जाणार आहे.