शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिका क्षेत्रात ८९३ बेकायदा बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:23 IST

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार । अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

भिवंडी : महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांना थारा देऊ नये, असे सक्त आदेश पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. असे असतानाही प्रभाग-१, २ व ३ मध्ये गेल्या वर्षभरात ८९३ बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या बांधकामांमुळे पालिकेचे दीडशे कोटींचे नुकसान झाले. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना नुकसानीला उपायुक्त व प्रभाग समिती अधिकाऱ्यांसह बीट निरीक्षक जबाबदार आहेत. त्यामुळे सरकार व आयुक्तांनी चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक नासीर सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडेही लेखी तक्र ार दिली आहे.

वर्षभरात प्रभाग समिती-१ व २ अंतर्गत ८९३ पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. नागरिक, नगरसेवक यांनी तक्रार करताच पालिका अधिकारी नोटीस बजावून एमआरटीपीअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करतात. त्यानंतर, पुन्हा बेकायदा बांधकामे उभी राहतात. गेल्या वर्षात विविध पोलीस ठाण्यांत ३२ तक्र ारी दाखल झाल्या आहेत. बºयाच वेळेला अधिकारीवर्ग इमारत तोडण्याच्या बहाण्याने पोलिसांचा वापर करून घेत असल्याचा आरोप नासीर सय्यद यांनी केला आहे. मिल्लतनगर, नागाव, गैबीनगर, आमपाडा, भादवड, टेमघर, शास्त्रीनगर, पिराणीपाडा, कल्याण रोड, पद्मानगर, शांतीनगर, गुलजारनगर, किडवाईनगर, चाविंद्रा, सुभाषनगर येथे सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांची आयुक्त हिरे यांनी पाहणी करून या बेकायदा बांधकामास जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.दरम्यान, या घटनांची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी बेकायदा बांधकामांस प्रोत्साहन देणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, असे आदेश उपायुक्त दीपक कुरळेकर यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम करणाºया व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे उल्लंघन करणाºया अधिकाºयांची चौकशी करून निलंबित केले जाईल. - मनोहर हिरे, आयुक्त

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे