शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमधील ७८ बार बंद

By admin | Updated: May 4, 2017 05:47 IST

मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये २००६ पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग झाल्यानंतरही त्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या रस्त्यावरील ७८ बार मंगळवारपासून बंद केले. त्यात काही वाईन व बिअर शॉपचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हा फटका बसल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. पश्चिम महामार्गावरील अनेक बार सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे बंद झाले आहेत. २००६ पूर्वी काशिमिरा ते उत्तन दरम्यान असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ सार्वजनिक विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत केला. त्यामुळे काशिमीरा ते पूर्वीचे रेल्वे फाटक दरम्यानचा रस्ता तसेच रेल्वे फाटक ते भार्इंदर पोलिस ठाणेमार्गे उत्तन दरम्यानच्या रस्त्याची देखभाल दुरूस्ती पालिकेकडूनच केली जाते. त्यामुळे सध्या हा महामार्ग नसून तो शहरातंर्गत वाहतुकीचा रस्ता २००६ पासून अस्तित्वात आला आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत झाल्याची पुर्नअधिसूचना विभागाने न काढल्यामुळे हा रस्ता उत्पादन शुल्क विभागाच्या दप्तरी राज्य महामार्ग म्हणूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे हा रस्ता महामार्गाशी संबंधित नसला तरी उत्पादन शुल्क विभागाने या मार्गावर सुरु असलेले ७८ बार, बिअर व वाईन शॉप मंगळवारपासून बंद केले आहेत. बार अचानक बंद केल्याने बारमालकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली. विभागाने त्यांना तो रस्ता पालिकेच्या अखत्यारित असल्याचे पत्र आणण्यास सांगितले. पत्र आणूनही त्यावर विभागाचे समाधान न झाल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडून पत्र आणण्याचे निर्देश दिले. ते पत्र बारमालकांनी आणल्यानंतर विभागाने अधिसूचनेची मागणी केली. मात्र बांधकाम विभागाकडे पुर्नअधिसूचनेची नोंदच नसल्याने बारमालकांची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)नूतनीकरणाचे शुल्क वसूलच्पत्रांनुसार उत्पादन शुल्क विभागाने त्या बारचे पुढील वर्षाचे आगाऊ नूतनीकरण शुल्कही वसूल केले आहे. त्यात परमीट रूमसाठी ४ लाख, वाईन शॉपसाठी ६ लाख व बिअर शॉपसाठी १ लाख २० हजार रुपये मालकांनी एक्साईज विभागाकडे जमा केले आहेत.च्नूतनीकरणाची रक्कम वसूल करूनही बार बंद केल्याने मालकांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली आहे. बारमालकांचेहोतेय नुकसानच्राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या पट्यातील बार बंद करण्याचे आदेश दिल्याने बारमालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पालिका व बांधकाम विभागाच्या दप्तरी तो रस्ता महामार्ग नसल्याची नोंद असतानाही केवळ अधिसूचना नसल्याचे कारण देत एक्साईज विभागाने केलेली कारवाई अयोग्य आहे. आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. - मधुकर शेट्टी, अध्यक्ष, बार आयहेल्प सेल. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० हून अधिक बार बंद केले आहेत. महामार्गाच्या नोंदीप्रमाणे ५०० मीटर परिसरातील बार बंद करणे अपेक्षित असतानाही तसे न करता केवळ गृहीत धरलेल्या महामार्गावरीलच बार बंद केले आहेत. हे अयोग्य आहे.- अरविंद शेट्टी, पदाधिकारी, मीरा-भार्इंदर हॉटेल असोसिएशन.