शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ७५ खासगी रुग्णालयांना मिळू लागला पुरेसा ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला आता येत्या दोन दिवसांत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला आता येत्या दोन दिवसांत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने तेथील ऑक्सिजनचे बेड पुन्हा सुरू केले जाणार आहेत. तर दुसरीकडे आता शहरातील खासगी कोविड आणि नॉनकोविड अशा ७५ रुग्णालयांनादेखील आता ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे पुरेसा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. तूर्तास ऑक्सिजनचे संकट टळले असले, तरीदेखील अतिरिक्त साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

ठाणे शहरात सध्याच्या घडीला १४ हजार ५४२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ६१३ रुग्ण हे क्रिटिकल असून, ४४२ आयसीयुमध्ये, तर १७१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात आजघडीला २५० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खासगी कोविड रुग्णालये आहेत, तर ५० नॉनकोविड रुग्णालयातदेखील कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना सध्या ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यांना रोजच्या रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करून खासगी रुग्णालयांची ऑक्सिजनची समस्या तूर्तास मार्गी लावली आहे. अतिरिक्त साठा मिळत नसला, तरीदेखील पुरेसा साठा आता या खासगी रुग्णालयांना मिळू लागला आहे. संपत येत असल्याने दुसरा साठा उपलब्ध होत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली. परंतु, रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांसाठी जास्तीचा ऑक्सिजन काही वेळेस लागत आहे. त्यामुळे वाढीव साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेने ऑक्सिजनचे दोन प्लाॅन्ट उभारण्याचे काम हाती घेतले असून, दोन ते तीन दिवसांत पार्किंग प्लाझा येथील ३५० ऑक्सिजनचे बेड सुरू करण्यात येणार आहेत, तर दुसरीकडे आता खासगी रुग्णालयांनादेखील पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होत असल्याने रुग्णांसोबतच ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.