शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींचे गाजर दाखवून बिल्डरला ७५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:12 IST

१०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत उच्चशिक्षित त्रिकुटाने भिवंडीतील बिल्डरला ७५ लाख २० हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे

कल्याण : १०० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत उच्चशिक्षित त्रिकुटाने भिवंडीतील बिल्डरला ७५ लाख २० हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या बिल्डरच्या फिर्यादीवरुन खडकपाडा पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भिवंडीच्या अंजूरदिवा येथे राहणारे अविनाश पाटील (३४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. व्यवसायानिमित्ताने त्यांची ओळख घन:श्याम शर्मा (रा. गोदरेजपार्क) तसेच सुब्रमण्यम आणि मनिला उर्फ मानसी यांच्याशी झाली. तेव्हा सुब्रमण्यमने फायनान्शिअल सर्व्हिसमध्ये पीएचडी केल्याचे पाटील यांना सांगितले.नंतरच्या गप्पांमध्ये पाटील यांना १०० कोटीच्या कर्जाची गरज असल्याचे या त्रिकूटाला समजले. त्यांनी पाटील यांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी शर्माने पाटील यांना इंडोनेशियात नेऊन तेथील एका हॉटेलमध्ये सुब्रमण्यमसोबत भेट घालून दिली होती. यावेळी मनिला उर्फ मानसी ही सुद्धा शर्मासोबत असायची. कर्जाच्या फाईलची मंजुरी, कर्जमंजुरीच्या कामासाठी तसेच बांधकामाचा अहवाल या निमित्ताने पाटील यांच्याकडून या त्रिकुटाने डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१७ या काळात ७५ लाख २० हजार रुपये उकळले.