शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

७४ रहिवाशांचा बळी : लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील जमीन मालकाची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 6:08 AM

७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.

ठाणे - ७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी जमीन मालक रवींद्र धाकल्या वातास (४५) यांची साक्ष नोंदविण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती. ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. त्यासाठी २00९ ते ११ या कालावधीत साठे खत, अखत्यारपत्र, भाडे करारनामा आणि समझौता पत्र असे चार करारनामे करण्यात आले. या करारनाम्यांवर आरोपींच्या सह्या आणि अंगठे आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी हे करारनामे जप्त केले होते. या करारनाम्यांचे सीलबंद पाकिट शुक्रवारी न्यायालयासमोर उघडण्यात आले. विशेष सरकारी वकिल शिषिर हिरे यांनी वातास यांची साक्ष नोंदवली. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तिथे पत्र्याचे गाळे बांधले. नंतर काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे वातास यांनी न्यायालयासमोर सांगितले.२०१३ मध्ये झाली दुर्घटनाग्रस्तशीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती.ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तेथे पत्र्याचे गाळे बांधले. काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केले.

टॅग्स :thaneठाणे