शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

चांगल्या रस्त्याच्या निर्मितीवर ७४ लाख उधळणार

By admin | Updated: April 25, 2016 02:54 IST

सरावली मानफोडपाडा येथील रहिवाशांच्या रस्त्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीकडे डोळेझाक करणारी नगरपरिषद मात्र सुस्थित असलेल्या पटेलपाडा रस्त्यावर 74 लाखाची उधळपट्टी

शौकत शेख, डहाणूसरावली मानफोडपाडा येथील रहिवाशांच्या रस्त्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीकडे डोळेझाक करणारी नगरपरिषद मात्र सुस्थित असलेल्या पटेलपाडा रस्त्यावर 74 लाखाची उधळपट्टी करण्यास उतावळी झाली आहे. त्यामुळे ही नगरपरिषद केवळ उच्चवर्गीयांच्या विकासासाठीच असल्याची भावना डहाणूतील नागरीक व्यक्त करु लागले आहेत.तसेच इतक्या मोठ्या कामाला मंजूरी देण्याबाबतचा कोणताही ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला नसल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात येत असून या कामाची प्रशासकीय मान्यता तपासून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे डहाणू पटेल पाडा अंतर्गत रस्ता वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच भाजपचे खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार मनीषा निमकर आणि आमदार पास्कल धनारे यांनी यापूर्वीच डहाणू नगरपरिषदेत मागील 2 वर्षात झालेली दलित वस्तीच्या विकासाची कामे तसेच बाजार कर निविदा याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यानंतर काही दिवसातच पटेलपाडा येथील रस्त्यावर गरज नसतांना 74 लाखाचा नाहक खर्च करण्याचा प्रयत्न उजेडात आल्याने डहाणू नगर परिषदेत एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. डहाणू नाशिक राज्यामार्गाला जोडून पटेल पाडा अंतर्गत रस्ता मागील 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणतीही अवजड वाहतूक नसल्याने रस्ता सुस्थितीत आहे, असे असताना डहाणू नगर परिषदेने रस्ते अनुदानानातून पटेलपाडा अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण आणि रु ंदीकरणासाठी तब्बल 74 लाखाची कामाची वर्कआॅर्डर मंजूर केली आहे. त्यामुळे डहाणू नगरपरिषदेकडून ही पैशाची उधळपट्टी असल्याची टीका विरोधकांकाडून होत आहेत. तर काही नगरसेवकांचे या ठेक्यात पडद्याआडून हितसंबंध गुंतले असल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे पटेल पाडा अंतर्गत रस्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. 500 मीटरच्या या आंतर्गत रस्त्यावर 74 लाखांची उधळपट्टी कोणाच्या चांगभल्यासाठी होते आहे. याचीच चर्चा सध्या शहरात सुरु आहे.