शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले ७१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 04:53 IST

नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण- डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

ठाणे : दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन संपण्यासाठी आठ दिवस शिल्लक असतानाच, ठाणे जिल्ह्यात रविवारी नव्याने ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक २0 रुग्ण हे नवी मुंबईत सापडले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण- डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त ४६ रुग्ण १३ एप्रिल रोजी आढळून आले होते. त्यानंतर बरोबर १३ दिवसांनी सर्वाधिक ७१ रुग्ण अक्षय्य तृतीयेला सापडल्याने कोरोनाचे संकट आणखी भीषण झाले आहे. नवी मुंबईत रविवारी २0 रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ ठामपा आणि मीरा-भार्इंदर येथे प्रत्येकी १७, केडीएमसी- १२, भिवंडी-२, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. उल्हासनगर येथे रविवारी एकही रु ग्ण सापडलेला नाही. वाढलेल्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या २२६ झाली आहे. केडीएमसी-१२९, भिवंडी-११, अंबरनाथ- ५, उल्हासनगर-२, बदलापूर-१७, मीरा-भार्इंदर-१४६, नवी मुंबई-१३१, ठाणे ग्रामीण-१८ असे जिल्ह्यात एकूण ६८६ रुग्ण आजवर झाले आहेत.>नवी मुंबईच्या रुग्णाचा ठाण्यात मृत्यूनवी मुंबईतील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू २२ एप्रिलला ठामपाच्या कळवा रुग्णालयात झाला. कोरोना अहवाल रविवारी आल्याने त्याच्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली. या रुग्णामुळे नवी मुंबईतील मृत रुग्णांची संख्या पाच झाली असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या २0 झाली आहे.वागळे इस्टेट ३ मेपर्यंत सीलरविवारी रात्री १२ वाजण्यापासून ३ मेपर्यंत वागळे इस्टेट प्रभाग समितीतील किसननगर, भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी, रोडनंबर १६ आणि रोड नंबर २२ हा परिसर पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हा परिसर पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदच्या काळात फक्त औषधाची दुकाने चालू राहतील. या परिसरांमध्ये संचारबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करत असल्याचे दिसून आले होते. वागळे इस्टेट प्रभाग समितीत रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या