शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:21 IST

खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते.

ठाणे : खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील ३२ हजार ६३ शेतकºयांना १६० कोटी १२ लाख ३९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. या शेतकºयांनी त्यांच्या २९ हजार ७८३.०५ हेक्टर शेतीवरील पिकांसाठी हे अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे. नऊ दिवसांच्या शेतकरी मेळाव्याद्वारे बहुतांशी शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले.आतापर्यंत पीक कर्ज घेतलेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ६८५ शेतकºयांनी १६ हजार ६७३.९५ हेक्टर शेतावरील पिकांवर ८९ कोटी सात लाख ४६ हजारांचे पीक कर्ज घेतले. यामध्ये नियमित कर्ज भरणाºया ११ हजार ४९३ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांनी ५२ कोटी ९६ लाखांच्या कर्जाचा लाभ घेतला. या शेतकºयांना टीडीसीसी बँकेने त्यांच्या नऊ हजार ६५६.१५ हेक्टरवरील पिकांवर कर्ज दिले आहे. कर्जमाफी झालेले, कर्ज सवलत दिलेले आणि प्रोत्साहनपर कर्जलाभ मिळवलेल्यांमध्ये आठ हजार १९२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना ३६ कोटी ११ लाखांचा कर्जलाभ झाला आहे.या पीक कर्जाचा सर्वाधिक शेतकºयांना लाभ घेता यावा, यासाठी टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्या शिष्टमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यांत नऊ दिवस शेतकरी मेळावे घेऊन जागृती केली. या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्यात ४५ कोटी ८५ लाख कर्जवाटप केल्याचे आढळून आले. सुमारे साडेतीन हजार शेतकºयांना या नऊ दिवसांच्या मेळाव्यादरम्यान पीक कर्जाचा लाभ दिल्याचे निदर्शनास आले. पालघर जिल्ह्यात मेळाव्यापूर्वी सुमारे आठ हजार ३१७ शेतकºयांना ५३ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप केले होते.यामध्ये नियमित कर्ज भरणारे सात हजार ३३४ शेतकरी असून त्यांना ४२ कोटी १७ लाखांच्या पीक कर्जाचा लाभ झाला.>६७ लाखांची इतर कर्जेठाणे जिल्ह्यात वाटप केलेल्या ८९ कोटींप्रमाणेच पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ कोटी चार लाख रुपये पीक कर्ज १२ हजार ३७८ शेतकºयांना वाटप केले आहे. याशिवाय, ८८ शेतकºयांना ६७ लाख ९४ हजारांची कर्ज सवलत दिल्याचे टीडीसीसी बँकेने स्पष्ट केले.