शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

कल्याण-डोंबिवलीत दिवसाला होणार ७ हजार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवले जाणार अहे. सध्या ३ हजार ५०० केल्या जात ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवले जाणार अहे. सध्या ३ हजार ५०० केल्या जात आहेत. त्यात दुप्पट वाढ करून दिवसाला ७ हजारच्या घरात टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजप शिष्टमंडळास दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेत महापालिकेने मोफत लसीकरण केंद्र सुरू केलेले नाही. यामुळे या भागात मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली. त्यावेळी बोलताना आयुक्तांनी हा मानस व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.

महापालिकेने डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डोंबिवलीतील रुग्णांची संख्या वाढ जास्त आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस मोफत देण्याची सुविधा डोंबिवली पूर्व भागात नाही. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील नागरिकांना पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात जावे लागते. यामुळे पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे. त्या ठिकाणी केवळ एका दिवसाला १०० जणांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यात वाढ करून दिवसाला किमान ५०० जणांचे लसीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली.

आयुक्तांनी नेमका किती लस साठा मागविला आहे. त्याचा पुरवठा का होत नाही. कमी का मागविला जात आहे, याबाबतही चव्हाण यांनी जाब विचारला.

------------------