शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: June 25, 2024 20:43 IST

राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई: तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी रात्री पनवेल- मुंब्रा रोडवर केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये ६९ लाखांचे गोवा निर्मित बनावट विदेशी मद्य, दोन मोबाईल आणि एका वाहनासह ८५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त प्रदीप पवार यांनी मंगळवारी दिली.

ठाण्यातील पनवेल- मुंब्रा रोडवरील पिंपरीगाव भागात परराज्यातील अवैध बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जून २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पनवेल मुंब्रा रोडवरील संगिता इलेक्ट्रीक अॅण्ड हार्डवेअर स्टोर या दुकानासमोर सापळा लावला. त्यावेळी निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, एस. जे. जरांडे तसेच केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नारायण जानकर आणि सागर चौधरी आदींच्या पथकाने सरकारी तसेच खाजगी वाहनाने पनवेल - मुंब्रा रोडवर एका दहा चाकी ट्रकमधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे ९६० बॉक्स हस्तगत केले.

या ट्रकचे चालक मोहम्मद शाहीद हुसेन (२४, रा. कोटला, जि. मेवात, हरियाणा राज्य. ) आणि नासीर सोकत हुसैन (२६ वर्षे, रा.हरियाणा राज्य ) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत ट्रकमधून ६९ लाखांचे बनावट विदेशी मद्याचे ९६० बॉक्स, दोन मोबाईल आणि वाहतूक करणारा ट्रक असा ८५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शाहीद आणि नासीर यांनी हा माल कुठूल घेतला? तो ते कोणाला देणार होते? त्यांची आणखी टोळी यामध्ये सामील आहे का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे