शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीत अवघ्या २२ दिवसांत ६,६७६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी तब्बल ६८६ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वोच्च रुग्णसंख्या ...

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी तब्बल ६८६ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वोच्च रुग्णसंख्या असून, याआधी १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. सोमवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर २४ तासांत ४२३ रुग्णांना उपचाराअंति बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीला पाच हजार १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या २२ दिवसांत सहा हजार ६७६ रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. ८ जूनपर्यंत लागू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती, तर यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु, आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ७१ हजार १५५ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६४ हजार ८७७ रुग्ण उपचाराअंति बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व भागात रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून, सोमवारी अनुक्रमे तब्बल २२६ आणि २३५ रुग्ण आढळले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही ९७, तर कल्याण पूर्वेत ८७ नवे रुग्ण सापडले आहेत, तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत.

-------------------------------------------

जून महिन्याचा रेकॉर्ड तोडला

८ जून २०२०पासून लॉकडाऊन संपुष्टात येऊन अनलॉक सुरू झाले. १ जून ते ३० जून कालावधीत नवे पाच हजार ५४२ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यातील रुग्णसंख्येला पाठीमागे टाकून मार्च महिन्यातील २२ दिवसांत रुग्णांचा आकडा सहा हजार ६७६ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

---------------------------------------------

पाटीदार भवन केंद्र सुरू होणार

प्रतिदिन ६०० ते ६५०हून अधिक रुग्ण नव्याने आढळत आहेत. सद्य:स्थितीला डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, जिमखाना आणि कल्याणमधील लालचौकी येथील आर्ट गॅलरी याठिकाणच्या कोविड केंद्रांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुरेशी बेड संख्या असली तरी दिवसागणिक वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता येत्या दोन दिवसांत डोंबिवली दावडी येथील पाटीदार भवन कोविड केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

------------------------------------------------------