शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात सरकारी जमिनीवर ६९२३४ अतिक्रमणे

By admin | Updated: November 4, 2015 22:59 IST

जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक नसून या बांधकामांचे प्रमाण वाढतेच आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये १९९५ पूर्वीची, त्यानंतर २००० पर्यंतची आणि २००१ नंतरच्या अशा ६९ हजार २३४ अतिक्रमणांची नोंद आढळली आहे. ही बांधकामे वेळीच हटवण्याऐवजी नोटीसा दिलेल्या अतिक्रमणधारकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन मालकी मिळविली, तर काहींनी कारवाईवर स्थगिती मिळविली आहे. नोव्हेंबर २०१३ पर्यंतच्या कारवाईनंतर प्रशासनाने त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा आलेख वाढलेलाच दिसतोय. यानंतरही सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे अपील केलेले आहे. यावरून काही अतिक्रमणाची प्रकरणे अंशत: पात्र, काहीना अपात्र ठरवण्याची कारवाई २०१३ पर्यंत झाली. मात्र त्यानंतर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे उघडकीस येते आहे.प्रशासनाने ठरविली १९,२७९ बांधकामे अपात्रजिल्ह्यातील २००१ पर्यंतच्या या अतिक्रमणामध्ये ठाण्यातील ३५४८६ बांधकामांसह कल्याणची ८७०५, भिवंडी -११८५५, शहापूर - ८७६, अंबरनाथ- १२३१२ अतिक्रमित बांधकामांचा समावेश आहे. या ६९२३४ अतिक्रमण केलेल्या बांधकामांपैकी ४९९५५ बांधकामे पात्र तर १९२७९ बांधकामे जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरविले ठरविली आहेत.