शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ६ माजी महापौर रिंगणात

By admin | Updated: February 9, 2017 03:57 IST

महापालिकेच्या ६ माजी महापौर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने यापैकी एकीच्या गळ्यात महापौरांची माळ पडण्याची शक्यता आ

सदानंद नाईक , उल्हासनगरमहापालिकेच्या ६ माजी महापौर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने यापैकी एकीच्या गळ्यात महापौरांची माळ पडण्याची शक्यता आहे. विजयाची खात्री देऊन या माजी महापौरांनी निवडणूक रिंगणात रंगत आणली आहे.उल्हासनगर विकासात सर्वच माजी महापौरांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या विशिष्ट कामाच्या कार्यशैलीने नागरिकांवर प्रभाव टाकला असून सर्वांनीच विजयाची शक्यता व्यक्त केली आहे. महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर म्हणून शिवसेनेच्या यशस्विनी नाईक यांना मान मिळाला. त्यांनी पालिका प्रशासनाला शिस्त लावून वचक बसवला होता. मात्र, पक्षाने तिकीट नाकारल्याने त्या बंडखोरी करून साई पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्र.-१४ मधून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र.-१२ मधून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर माजी महापौर मालती करोतिया उतरल्या आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर लीलाबाई आशान प्रभाग क्र.-१४ मधून, माजी महापौर विद्या निर्मले याही शिवसेनेतून बंडखोरी करून प्रभाग क्र.-१९ मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.शिवसेनेच्या सर्वाधिक यशस्वी कार्यकाळातील माजी महापौर राजश्री चौधरी प्रभाग क्र.-१० मधून, तर आशा इदनानी साई पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. प्रत्येक महापौरांचा कार्यकाळ गाजला असून विकासकामांवर निवडून देण्यासाठी नागरिकांकडे साकडे घालत आहेत. महापालिकेत शिवसेना विरूद्ध भाजपा-ओमी टीम अशी सरळ लढत असली, तरी सत्तेच्या चाव्या साई पक्षाकडे राहणार असल्याचे संकेत राजकीयतज्ज्ञ देत आहेत. भाजपा-ओमी टीमकडून महापौरपदासाठी पंचम कलानी, मीना आयलानी, जया माखिजा, तर शिवसेनेकडून माजी महापौर राजश्री चौधरी, वसुधा बोडारे, माजी महापौर लीलाबाई आशान, साई पक्षाकडून माजी महापौर आशा इदनानी यांचे नाव पुढे केले जात आहे. काँग्रेसच्या माजी महापौर मालती करोतिया, माजी उपमहापौर जया साधवानी, रिपाइंच्या पंचशीला पवार यांचे नावही चर्चेत आले आहे. महापौरपदासाठी कोण बाजी मारतो, हे २३ फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशी समजणार आहे.