कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेत मंगळवारी प्रथमच आॅनलाइन बदल्यांची प्रक्रिया पार पडली. यात अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण ५७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सहा अधीक्षक, सात वरिष्ठ लिपिक, दोन रोखपाल, दोन उपलेखापाल, पाच वरिष्ठ लेखापाल, १५ आरोग्य निरीक्षक, तीन ड्राफ्ट्समन, आठ कॉम्प्युटर आॅपरेटर, सात लघुलेखक यांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी सेवाजेष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीची संधी दिली गेली. त्यानंतर ज्येष्ठ क्रमानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मध्यंतरी आयुक्त ई. रवींद्रन यांनी आढावा घेतला होता. यात वर्षानुवर्षे काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला बदल्यांचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)
केडीएमसीत ५७ जणांच्या आॅनलाइन बदल्या
By admin | Updated: June 15, 2016 02:28 IST