शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:21 IST

मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्याना वारंवार मारहाणअभय योजनेलाही अल्प प्रतिसाद

ठाणे - महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शिळ या भागात महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने धडक कारवाई करुन मागील आठ महिन्यात १३६४ वीज चोऱ्या पकडल्या आहेत. यामध्ये त्यांच्याकडून एक कोटी ९५ लाख वसुल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महावितरणने मुंब्रा, शीळ भागात तब्बल ५७ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ग्राहकांकडे मुद्दल आणि व्याजासह ३०० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या सुत्रांनी दिली आहे.

                  महावितरणने आॅगस्ट २०१७ पासून पकडलेल्या १३६४ केसेसमध्ये एकूण १९ हजार ५११ इतक्या युनिटची वीज चोरी करण्यात आली असून याचे मुल्य सुमारे एक कोटी ९५ लाख इतके होते. यापैकी ६५० विजचोरांनी सुमारे एक कोटी सात लाख रु पयांचा भरणा केला आहे. यामध्ये ६५० पैकी ४९० ग्राहकांनी नियमानुसार तडजोड करून सुमारे १८ लाखांची दंडाची रक्कम महावितरणकडे भरणा केली आहे. तर उर्वरीत ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी पाठपुरावा करत असून त्यांनी दंडासह रक्कम न भरल्यास त्यांच्यावर रितसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.अभय योजनेस अत्यंत अल्प प्रतिसादमहावितरणने कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु मुंब्रा व शिळ या भागातून अशा योजनांना नेहमीच अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या भागात सुमारे ५७ हजार इतक्या ग्राहकांची वीज कायम स्वरूपी खंडित केली असून त्यांच्याकडे २५० कोटी मुद्दल व ५० कोटी व्याज अशी एकूण सुमारे ३०० कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. असे असले तरी सध्या सुरु असलेल्या अभय योजने अंतर्गत ठाणे ३ विभागात नव्याने रु जू झालेले टीमने सुमारे दोन हजार ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी वसूल केले आहेत.एजंट लोकांच्या भूलथापांना बळी न पडता; ग्राहकांना सहकार्याचे आवाहनमहावितरणने चालू व थकीत वीज बिल वसुली करता तसेच नवीन जोडणी व अन्य सुविधांकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा एजंटच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. ग्राहकांनी एजंटवर विश्वास टाकल्यास आणि त्यांची फसवणूक झाल्यास त्याबाबतची कोणतीही जबाबदारी महावितरण घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सध्या मार्च एंड असल्यामुळे ग्राहकांनी त्यांचे चालू तसेच थकीत बिल दंडासह भरवीत. याकरता महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्रात जावे किंवा महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.कर्मचाऱ्याना मारहाणवीज बील वसुली व इतर दैनंदिन कामे करताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होण्याच्या घटना मुंब्रा व शिळ या भागात मोठ्या प्रमाणात होतात. मागील आठ महिन्यात कर्मचाºयांना मारहाणीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. यातील सर्व दोषी ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राcommissionerआयुक्त