शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबसंख्या 5.61 लाख, पाणीबिले मात्र 2.25 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:10 IST

११५ कोटींची वसुली : २० नळजोडण्या खंडित, कारवाईची नोंद नाही

- अजित मांडकेठाणे :   ठाणे  महापालिकेकडून पाणीबिलांच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याबरोबर इतर उपायदेखील केले जात आहेत. शहरातील पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांपैकी दोन लाख २३ हजार ४ नळजोडण्या दिलेल्या आहेत. तर आतापर्यंत पाणी बिलापोटी ११५ कोटींची वसुली झालेली असून  ६५ कोटींची थकबाकी येणे आहे. यासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांपासून सुमारे २० हजारांहून अधिक अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. आजघडीला शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या घरात आहे. शहराला रोज ४८८ दशलक्ष पाणीपुरवठा होत आहे. तर शहरात नऊ  लाखांहून अधिक झोपड्या असून गृहसंकुलांची संख्यादेखील १० हजारांच्या वर गेली आहे. असे असले तरी आजही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच लाख ६० हजार ७०७ कुटुंबांना नळजोडण्या दिल्या आहेत.  परंतु बिले मात्र दोन लाख २३ हजार चारच दिली जात आहेत. काही ठिकाणी चाळ सिस्टम असल्याने चाळींचे एकत्रित बिल काढले जात आहे. तर गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील प्रत्येक इमारतीचे एकच बिल काढले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच बिले लावण्यात येत असल्याची संख्या काहीशी कमी दिसत असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.असे असतानाही आजही शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी घेतली जात आहे. त्यावर महापालिका कारवाईदेखील करते. परंतु त्यांची संख्या मात्र दप्तरी उपलब्ध नाही, किंबहुना त्याचा सर्व्हेही केलेला नाही. २० हजार अनधिकृत नळठाणे महापालिका दरवर्षी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करते. त्यानुसार या आर्थिक वर्षात आतापर्यंत अडीच हजारच्या आसपास अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. तर मागील दोन वर्षांत २० हजारांहून अधिक नळजोडण्या खंडित केल्या आहेत.निम्म्या पाण्याची गळतीशहराला रोज ४८८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, आजही पाण्याची चोरी, नियोजनाचा अभाव आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणीगळतीचे प्रमाण यामुळे शहरात ४५ टक्के पाणीगळती आहे.थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. ज्यांची अधिकची थकबाकी असेल त्यांचे कनेक्शन खंडित केले जात आहे. याशिवाय पाणीगळती रोखण्यासाठीदेखील विविध स्वरूपाचे उपाय केले जात आहेत.    - विनोद पवार , कार्यकारी     अभियंता - पाणीपुरवठा     विभाग, ठामपाअनधिकृत नळजोडण्या तोडल्या जात असल्या तरी अधिकृत नळधारकांनीदेखील ६५ कोटींची देणी थकवली आहेत. ती वसूल करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना पुढे आणल्या जात आहेत. तसेच थकीत रकमेवरील व्याजही माफ केले जात आहे. परंतु, असे असले तरी अद्यापही ही वसुली महापालिकेला करता आलेली नाही.