शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर ५०० कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त

By admin | Updated: January 11, 2017 04:59 IST

अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

ठाणे : अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत १९ कोटींचे अमलीपदार्थ हस्तगत केले असून, बुधवारी कंपनीतील आणखी ११५ टन अमलीपदार्थांसह रसायनाची तपासणी केली जाणार आहे. जर यात अनियमितता आढळल्यास ही सुमारे ५०० कोटींची मालमत्ता जप्त करून कंपनीही सील केली जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. अंबरनाथच्या या कंपनीतून १८ कोटी ८५ लाखांचा ७५४ किलो अल्प्राझोलम हा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे. त्याआधी ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या दोघांकडून १५ लाखांचा ६ किलोचा ऐवज ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने कंपनीतील रसायन आणि अमलीपदार्थ तपासणीची व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. कंपनीतील गोदामे सील केली असून, मालाच्या वैधतेची तपासणी केली जात असल्याचे सहायक  पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)