शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकराच्या वाजवी दरात ५० टक्क्यांपर्यंत सूट

By admin | Updated: May 5, 2017 05:43 IST

रेडी रेकनर दराचा आधार घेऊन मूल्यवर्धित करप्रणालीनुसार २०१६-१७ मध्ये विकसित केलेल्या मालमत्ताधारकांवर लादलेली करवाढ

ठाणे : रेडी रेकनर दराचा आधार घेऊन मूल्यवर्धित करप्रणालीनुसार २०१६-१७ मध्ये विकसित केलेल्या मालमत्ताधारकांवर लादलेली करवाढ २५ ते ५० टक्के कमी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. रेडी रेकनर दर हा घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक असल्याने वाढीव कराचा जास्त फटका घोडबंदर पट्ट्यातील मालमत्ताधारकांना बसला होता. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना चारपट दराने मालमत्ताकराची बिले पाठवण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर भरणे नागरिकांना शक्य नसल्याने ठाण्यातील विविध संघटना तसेच नागरिकांनी तो कमी करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. महानगरपालिकेने २०१६-२०१७ सालामध्ये विकसित होणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य ज्या आधारे ठरवण्यात येते, त्या वाजवी भाड्यामध्ये वाढ केली होती. सदरची दरवाढ १ एप्रिल २०१७ पासून अमलातही आली होती. १ एप्रिल २०१६ नंतर रेडी रेकनरचे दर वाढले असून ते घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक असल्याने या पट्ट्यात करआकारणीदेखील सर्वाधिक आहे. सर्वात कमी दर कळवा-मुंब्रा भागांत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पात येत्या दोन वर्षांमध्ये भांडवली करप्रणाली लागू करण्याचा महापालिकेचा मानस असून ही करप्रणाली लागू झाल्यास मालमत्ताकरामध्ये आणखी वाढ होणार आहे. मूल्यवर्धित प्रणालीनुसार मालमत्ताकराची बिले देण्यात आल्यानंतर बिलावर आकारण्यात आलेली रक्कम बघून ठाणेकर नागरिक हैराण झाले होते. घोडबंदर पट्ट्यातील नागरिकांना तर हा कर चारपट अधिक आल्याने तो एवढा वाढला कसा, हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यास सुरु वात केली होती. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यातील ज्यांचा वन बीएचके फ्लॅट आहे, त्यांना २० ते २५ हजार, तर ज्यांचा २ बीचके फ्लॅट आहे, त्यांना ३० ते ३३ हजारांच्या घरात मालमत्ताकराची बिले पाठवली होती. (प्रतिनिधी) १मूल्यवर्धित करप्रणालीनुसार घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक ४.८० रु पये प्रतिचौरस फूट मालमत्ताकर लावण्यात आला आहे. नौपाडा भागात ४.६०, वागळे पट्ट्यात ४.२०, तर कळवा आणि मुंब्रा परिसरांत ३ रु पयांपेक्षा अधिक प्रतिचौरस फूट दर लावल्याने घोडबंदर परिसरातील नागरिकांचे कंबरडेच या वाढीव करप्रणाली मोडले होते.२दरम्यान, वाजवी दरामधील ही वाढ जास्त प्रमाणात असल्याने एमसीएचआय, पत्रकार संघटना तसेच विविध संस्थांनी महापालिका आयुक्त जयस्वाल यांची भेट घेऊन सदर दराविषयी फेरविचार करावा, अशी विनंती केली होती. ३त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सारासार विचार करून वाजवी दरामध्ये साधारत: २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे २०१६-२०१७ या वर्षामध्ये विकसित होणाऱ्या अनेक मिळकतधारकांना याचा फायदा होणार आहे.