शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातून ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:44 IST

नालासोपारा येथील एका रहिवाशाजवळून सुमारे ५० लाख रुपयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त केल्या.

ठाणे/मुंब्रा : नालासोपारा येथील एका रहिवाशाजवळून सुमारे ५० लाख रुपयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त केल्या.चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन एक आरोपी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी रेल्वे स्थानकासमोरील मुंब्रा हॉटेलजवळ सापळा रचला. हॉटेलजवळील ओव्हरब्रिजखाली काळ्या रंगाची बॅग पाठीवर घेतलेल्या एका व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बॅग तपासली असता, त्यामध्ये पाचशे रुपयांच्या २००२, तर हजार रुपयांच्या ३९३८ नोटा असे एकूण ४९ लाख ३९ हजार रुपये आढळले.आरोपीचे नाव जफर अहमद मोहम्मद शोएब शेख असून तो नालासोपारा (पूर्व) येथील अचोले रोडवरील साईश्रद्धा सोसायटीचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल फोन जप्त केला आहे. त्याआधारेही तपास सुरू आहे. नोटाबंदीनंतर या जुन्या नोटा नेमकया कोणत्या व्यक्ती खरेदी करणार होत्या, हा व्यवहार तो कुणाशी करणार होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या अशा नोटा बाळगणे हा गुन्हा आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.