पारोळ : विरार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील विरारफाटा येथे जेम्स बॅटरी या कंपनीत चार दरोडेखोरांनी वॉचमन प्रकाश इंगळे याला मारहाण करनू त्याला बांधून ठेवत पाच लाखाच्या मुद्देमालाची लुट करून पोबारा केला.बुधवारी पहाटेच्या सुमारास प्रकाश जेम्स कंपनीत पहारा देत असताना तोडांवर काळा कपडा बांधून आलेल्या चौघांनी वॉचमनला मारहाण करून त्याला बांधून ठेवले. मात्र, या कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सात कॅमेरे तोडून टाकले व वीस बॅटरी, तीन हजार जाळ्या, बॅटरी बसवण्यासाठी लागणाऱ्या १००० प्लेट असा एकूण पाच लाख रू. चा मुद्देमाल चोरून नेला.या घटनेची नोंद विरार पोलीसात झाली असता त्यांनी कंपनीच्या कामगारांची चौकशी केली. पण काहीही माहिती न मिळाल्याने चोरटे बाहेरचे असल्याचे पोलीसांनी सांगितले. चोरलेले सामान इतर कामासाठी उपयोगी नसून ते फक्त या व्यवसायात असणाऱ्यांनाच उपयोगी असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. (वार्ताहर)
जेम्स बॅटरीज कंपनीत वॉचमनला बांधून केली ५ लाखांची लूट
By admin | Updated: September 26, 2015 00:37 IST