शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उल्हासनगरात स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; ११ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 07:23 IST

चौथ्या मजल्याचे छत पत्त्याच्या बंगल्यासारखे आले तळमजल्यावर

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. १ परिसरातील मोहिनी पॅलेस या चारमजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळून शनिवारी झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर ११ जण जखमी झाले आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं. १ परिसरात मोहिनी पॅलेस ही चारमजली इमारत १९९४ मध्ये बांधण्यात आली आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळून ते तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या व तळमजल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखे येऊन कोसळले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. भीतीने नागरिक पळत सुटले. स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत आल्याने, इमारतीमधील २० ते २५ नागरिक यामध्ये अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त केली जात होती. 

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती सहायक आयुक्त शिंपी यांनी दिली. इमारतीच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. मदतकार्य सुरू असताना, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, मदतकार्याला वेग आला.

मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या मजल्याचे छत कोसळताच इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने  दिली. त्यापैकी दोघांचे मृतदेह सुरुवातीला बाहेर काढले. नंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले, तसे आणखी तीन मृतदेह हाती लागले. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी कोण अडकले आहे का, याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता.

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना संत थारासिंग दरबार यांनी मदतीचा हात दिला असून, महापालिका त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.या घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावेमॉन्टी मिलिंद पारचे (१२), सावित्री पारचे (६०), हरेश डोडवाल (५२), ऐश्वर्या हरेश डोडवाल (२३), संध्या हरेश डोडवाल (५०).

दुर्घटनेनंतर सदनिकांमध्ये अडकलेल्या रहिवाशांना खिडकीचे गज कापून बाहेर काढण्यात आले. एकूण १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.