शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक करणार बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश

By अजित मांडके | Updated: February 10, 2023 10:33 IST

अवघ्या दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे १२ वाजविणार असा इशारा दिला होता.

ठाणे  :

अवघ्या दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे १२ वाजविणार असा इशारा दिला होता. त्यानंतर आता हीच तारीख बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची निश्चित झाली असून लोकमान्य नगर भागात हा प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. परंतु आपण राष्ट्रवादी का सोडतो आहे, कशासाठी दुस:या पक्षात जात आहोत, याची भावनिक साद राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी येथील जनतेला घातली आहे. त्यांनी देखील आपली बाजू समजून घ्यावी असे त्यांनी येथील घराघरात धाडलेल्या पत्रत नमुद केले आहे. त्यानुसार आता १२ तारखेला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक  बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत. आज जगदाळे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करणार आहेत.ठाण्यात राष्ट्रवादीची मोडतोड करण्याची व्युव्हरचना बाळासाहेबांची सिवसेना पक्षाने आखली आहे.  त्यानुसार आता पहिल्या टप्यात राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक यामध्ये हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे आदींसह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आदींसह इतर पदाधिका:यांचा त्यात समावेश आहे. तसेच याच पटय़ातील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा या देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रंनी दिली.  त्यामुळे राष्ट्रवादीला लोकमान्य नगर पटय़ात मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.जगदाळे यांनी मतदारांना घातली भावनिक साद हणमंत जगदाळे राष्ट्रवादी सोडणार हे निश्चित मानले जात होते. मात्र प्रवेशाची तारीख निश्चित नव्हती. आता मात्र येत्या १२ फेब्रुवारी रोजी हा प्रवेश निश्चित झाला असून आपण हा प्रवेश का करीत आहोत, यासाठी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. यात ४० ते ४५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत सामाजिक जीवनात काम करीत असतांना, सुरवातीला कॉंग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत काम केले आहे. परंतु ही वाटचाल करीत असतांना माझी वैचारीक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याची माहिती श्रेष्ठींकडे देखील दिली आहे. त्यानुसार तुमचा स्वाभीमानी सेवक कोणापुढे झुकणार नाही, हे देखील त्यांनी सांगितले होते. संयम पाळला, मात्र आता संयमाचा बांध फुटला आहे. मी जग जिंकले नाही, मात्र जनमत मिळविले आहे. त्याच जनमाताच्या खातर लोकमान्य, शास्त्री नगर भागाचा विकास करण्यासाठी या शिंदे यांच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही पक्ष सोडत असतांना मी कोणाला दोष देणार नसल्याचे त्यांनी यात नमुद केले आहे.