शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत ४७ बालकांचा मृत्यू, ठाणे रुग्णालयातील घटना,  इन्क्युबेटरचा अभाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:12 IST

आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

ठाणे : आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे. या काळात ३६ बालकांना मुंबईतील रुग्णालयात पाठवल्याचे उघड झाले.ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग सज्ज ठेवण्यात येतो. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्रियेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेली बालके, अपुºया दिवसांच्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १६ इन्क्युबेटर असून एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये अनेकदा दोन ते तीन बालकांना ठेवले जात असल्याचे विदारक चित्र आहे.अर्भकांची प्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य द्वितीय श्रेणीत मोडते. त्यामुळे येथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. नवजात शिशू विशेष उपचार कक्षातील गंभीर झालेल्या बालकांना जर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली, तर त्यांना त्या अवस्तेच मुंबईला पाठवावे लागते. अनेकदा या फरफटीत आधीच प्रकृती नाजूक असलेली ही बालके दगावतात. पण ठाण्यासारख्या स्मार्ट होऊ घातलेल्या शहरात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने या मुलांचा तडफडून होणारा मृत्यू पाहण्याखेरीज पालकांच्या काहीच हाती उरत नाही.लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्याने संतापठाणे जिल्ह्यातून तीन खासदार, विधानसभेचे १८ आणि विधान परिषदेचे ६ असे २४ आमदार आहेत. मात्र, हे लोकप्रतिनिधी कुपोषणाने बळी जाणाºया बालकांविषयी जेवढे निद्रिस्त आहेत, तेवढेच सामान्य रुग्णालयात इन्क्युबेटरअभावी मृत्यू झालेल्या ४७ बालकांबाबतीतही असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.